adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल व सेमी इंग्लिश मीडीअम स्कूल मध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

 सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल व सेमी इंग्लिश मीडीअम स्कूल मध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी भरत कोळ...

 सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल व सेमी इंग्लिश मीडीअम स्कूल मध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

भरत कोळी यावल

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल:-  सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल व सेमी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शाळेचे अध्यक्ष डॉ . प्रदीप माहेश्वरी सर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शीला तायडे मॅडम यांच्या उपस्थितीत विश्वरत्न महामानव भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती साजरी करण्यात आली. प्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शिला तायडे मॅडम यांच्या हस्ते विश्वरत्न महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला सौ शीला तायडे मॅडम यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात घडलेले प्रसंग गीतांच्या माध्यमातून गाऊन दाखविले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाला व संपूर्ण जगाला समता व बंधुत्व हा मूलमंत्र दिला .अशा या महामानवाचे भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील मानव  जातीवर खूप खूप उपकार आहे.  या शब्दांमध्ये सौ शीला तायडे मॅडम यांनी आपले मत व्यक्त केले. या कार्यक्रमाप्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

No comments