जे. टी. महाजन इंग्लिश स्कूल यावल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आज दिनां...
जे. टी. महाजन इंग्लिश स्कूल यावल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी
भरत कोळी यावल
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आज दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी येथील व्यास शिक्षण मंडळ संचालित जे. टी. महाजन इंग्लिश स्कूल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ. रंजना महाजन मॅडम आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर च्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन केले तसेच इंग्लिश मिडीयम च्या प्राचार्या श्रीमती दिपाली धांडे मॅडम यादेखील उपस्थित होत्या तसेच शाळेच्या पर्यवेक्षिका सौ. गौरी भिरूड मॅडम व श्रीमती राजश्री लोखंडे मॅडम यांनी उपस्थिती दिली.
त्यानंतर शाळेतील शिक्षिका सौ. श्रद्धा बडगुजर मॅडम आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रा बद्दल माहिती देऊन त्यांनी केलेल्या समाज प्रबोधनाचे सुद्धा माहिती सांगून गीत सादर केले. व विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शाळेच्या प्राचार्या यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून 135 व्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका डिंपल इंगळे मॅडम यांनी केले व आभार प्रदर्शन शाळेतील शिक्षिका सौ. कुंदा नारखेडे मॅडम यांनी केले शिक्षक व शिक्षकेतर सहकारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम उत्साहात पार पडला.

No comments