adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावलचा स्वराज गडे राज्यस्तरीय मंथन परीक्षेत उज्वल यश

 यावलचा स्वराज गडे राज्यस्तरीय मंथन परीक्षेत उज्वल यश  भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल:- येथील व्यास शिक्षण मंडळ संचलित जे. ...

 यावलचा स्वराज गडे राज्यस्तरीय मंथन परीक्षेत उज्वल यश 


भरत कोळी यावल

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल:- येथील व्यास शिक्षण मंडळ संचलित जे. टी. महाजन इंग्लिश स्कूलमधील इयत्ता चौथी (सेमी)चा विद्यार्थी स्वराज मंदार गडे याने राज्यस्तरीय मंथन परीक्षा 2025-26 मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्याने 300 पैकी तब्बल 276 गुण मिळवत जळगाव जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावला असून राज्यस्तरावर तेरावा क्रमांक मिळवून शाळा व परिसराचे नाव उज्ज्वल केले आहे.

स्वराज गडे याला या यशासाठी यावल येथील बाल संस्कार शाळेच्या माजी शिक्षिका रोहिणी पाठक तसेच चेतन चौधरी सर यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या नेत्रदीपक कामगिरीबद्दल जे. टी. महाजन इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. रंजना महाजन, वर्गशिक्षिका सौ. पूनम कोळंबे तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्वराजचे अभिनंदन करून कौतुक केले.

स्वराजच्या या यशामुळे शाळेचे नाव राज्यस्तरावर झळकले असून सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.

No comments