adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

२१ एप्रिलपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; जळगाव जिल्ह्यात १२ हजार कर्मचाऱ्यांचा सहभाग

  २१ एप्रिलपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; जळगाव जिल्ह्यात १२ हजार कर्मचाऱ्यांचा सहभाग  जळगाव प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गाय...

  २१ एप्रिलपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; जळगाव जिल्ह्यात १२ हजार कर्मचाऱ्यांचा सहभाग 


जळगाव प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

जळगाव:-  राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती शाखा-जळगाव, राज्य शासकीय निमशासकीय व जिल्हापरिषद वाहन चालक वर्ग-३ कर्मचारी संघटना शाखा जळगाव तसेच महाराष्ट्र राज्य गट-ड (चतुर्थ श्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध प्रलंबित मागण्यांसाठी दि. २१ एप्रिल २०२६ पासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे.

कर्मचाऱ्यांच्या एकूण २० प्रलंबित मागण्यांसाठी हा संप आयोजित करण्यात आला असून, जिल्ह्यातील विविध खात्यांतील संघटनांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे. महसूल, कोषागार, सहकार, आयटीआय, तंत्रनिकेतन, नियोजन, मुद्रांक विभाग, कृषी खाते आदी विविध विभागांतील कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत.

जळगाव जिल्ह्यात हा बेमुदत संप १०० टक्के यशस्वी राबविण्यात आल्याचा दावा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केला असून, सुमारे १२ हजार कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

या संपामध्ये जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मगन पाटील, सरचिटणीस योगेश नन्नवरे, कार्याध्यक्ष वासुदेव जगताप, कोषाध्यक्ष घनश्याम चौधरी, उपाध्यक्ष तथा राज्यसंघटक अमर परदेशी, उपाध्यक्ष दीपक चौधरी, हर्षल दांडेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

तसेच राज्य शासकीय निमशासकीय व जिल्हापरिषद वाहन चालक वर्ग-३ कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष सलीम दादा पटेल, अध्यक्ष भरत चौधरी, सचिव संदीप पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

याशिवाय कोषागार कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष राकेश जाधव, सचिव योगेश कोकरे तसेच महाराष्ट्र राज्य गट-ड कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष देविदास अडकमोल, सचिव नूर शेख लाल आणि इतर विविध खात्यांतील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपामध्ये महिला कर्मचारी व विविध विभागांतील पदाधिकाऱ्यांनीही सक्रिय सहभाग नोंदविला, ज्यामध्ये कविता पाटील, अनिता सोमवंशी, शुभांगी बिऱ्हाडे, स्मिता महाजन, वृंदा पाटील, वर्षा तायडे, जिज्ञा भारंबे, मनीषा पारधी, सुप्रिया म्हस्के, माधवी परमसागर यांचा समावेश आहे.

दरम्यान, सहकार खात्यातील कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विक्रांत मस्के, उपाध्यक्ष भालचंद्र देशपांडे, सरचिटणीस धीरज पाटील, सचिव अजित पाटील यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनीही संपात सहभाग नोंदविला.

सरकारने प्रलंबित मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनांकडून देण्यात आला आहे.

योगेश नन्नवरे

सरचिटणीस

जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी संघटना, जळगाव.

No comments