सक्षमरत्न पुरस्कार विजेते ज्येष्ठ पत्रकार रमेश पाटील यांचा चोपड्यात गौरव चोपडा (प्रतिनिधी) :- (संपादक :- हेमकांत गायकवाड) शहरातील नारायणवा...
सक्षमरत्न पुरस्कार विजेते ज्येष्ठ पत्रकार रमेश पाटील यांचा चोपड्यात गौरव
चोपडा (प्रतिनिधी) :-
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
शहरातील नारायणवाडी भागात असलेल्या ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहात सक्षमरत्न पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ पत्रकार रमेश पाटील यांना गौरविण्यात आले. यावेळी सर्व ज्येष्ठ नागरिक संघ बंधूंनी गौरक्षा अभी यानातही भाग घेतला. के.डी .चौधरी व परिवारातर्फे ज्येष्ठ नागरिकांना ग्लुकोज पावडर व फ्रुट ज्यूस वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी रमेश शिंदे तात्या होते.व्यासपीठावर ज्येष्ठ सदस्य मधुकर पाटील, जगन्नाथ पाटील, टी. एम. चौधरी, व ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष जय देव नाना देशमुख होते. 27 एप्रिल पासून सुरु होणाऱ्या गोसेवा रक्षा अभियान कार्यक्रमाची रूपरेषा यावेळी मांडताना आपल्या प्रास्ताविकात चौधरी यांनी गोमातेला भारत सरकारने राष्ट्रीय दर्जा दिला पाहिजे. गाय वाचली तर हिंदू धर्म वाचेल असे सांगितले, टी एम चौधरी यांनी आपल्या भाषणातून गाईचे महत्त्व विशद केले. अध्यक्षीय भाषणात शिंदे तात्या म्हणाले की, गोरक्ष अभियान काळात सर्वांनी योगदान देणे गरजेचे आहे. रमेश पाटील यांनी लेखणीद्वारे अनेकांना न्याय दिला त्यांचे मोत्यासारखे हस्ताक्षर आणि त्यांचा महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये असलेला सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यांना मिळालेला पुरस्कार हा त्यांच्यातली गुणग्राहकता पारखून मिळालेला पुरस्कार आहे. असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. देवकांत चौधरी, श्याम भाई गुजराती, गो.बा. महाजन, प्रा. एस के पाटील, डोंगरे, प्रा. सुधाकर पाटील, सुबोध गुजराती, बडगुजर, शेख, सतीश पाटील ज्ञानेश्वर पाटील, गोरक्ष समितीचे अनेक पदाधिकारी व ज्येष्ठ नागरिक यावेळी उपस्थित होते सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विलास पाटील( खेडी भोकरी कर) यांनी केले..

No comments