adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सक्षमरत्न पुरस्कार प्राप्त कवी रमेश पाटील यांना आडगावकरांनी गौरविले

  सक्षमरत्न पुरस्कार प्राप्त कवी रमेश पाटील यांना आडगावकरांनी गौरविले चोपडा (प्रतिनिधी) :- (संपादक :- हेमकांत गायकवाड) तालुक्यातील आडगाव येथ...

 सक्षमरत्न पुरस्कार प्राप्त कवी रमेश पाटील यांना आडगावकरांनी गौरविले



चोपडा (प्रतिनिधी) :-

(संपादक :- हेमकांत गायकवाड)


तालुक्यातील आडगाव येथील जेष्ठ पत्रकार तथा कवी लेखक व साहित्यिक रमेश जे. पाटील यांना नुकताच नाशिक येथे सक्षम पोलीस टाइम्स यांच्या वतीने दिला गेलेला सक्षमरत्न पुरस्कार म्हणजे त्यांनी केलेल्या सेवेचे ते फळ आहे पाटील यांनी गावात सर्वांशी बांधिलकी ठेवली, पत्रकारिता करताना त्यांनी कधीही कुणाशी स्पर्धा केली नाही व कुणाचा द्वेष केला नाही असे प्रतिपादन यावेळी चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा माजी सरपंच आडगाव येथील पंडित रामदास पाटील यांनी येथे केले. आडगाव तालुका चोपडा येथे दिनांक ६ रोजी सकाळी नऊ वाजता महा रक्त दाता भिला भोमा पाटील यांच्या निवासस्थानी छोटे खाणी सत्कार समारंभात केला. यावेळी मा. सरपंच रावसाहेब पाटील , शेतकी संघाचे संचालक शामकांत पाटील, प्रगतिशील शेतकरी अंबादास पाटील, ओम शांती परिवाराचे माणिक पाटील, प्रताप पाटील (मोहिदेकर) विविध कार्यकारी सहकारी सोसायटी संचालक कैलास रामकृष्ण पाटील मधुकर देवराम पाटील, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांना गौरविण्यात आले.

No comments