“Jhpiego व सुनंदन संस्थेकडून अति दुर्गम आदिवासी भागातील आशा सेविकांसाठी विशेष प्रशिक्षण; ‘आशा’ चित्रपटातून प्रेरणा” चोपडा प्रतिनिधी (संपा...
“Jhpiego व सुनंदन संस्थेकडून अति दुर्गम आदिवासी भागातील आशा सेविकांसाठी विशेष प्रशिक्षण; ‘आशा’ चित्रपटातून प्रेरणा”
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा:- अति दुर्गम आदिवासी भागात कार्यरत आशा सेविकांसाठी एक दिवसीय विशेष प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला. Jhpiego व सुनंदन बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली, Jhpiego संस्थेकडून आदिवासी भागात सुरू असलेल्या माता व बाल आरोग्य कार्यक्रमांतर्गत या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणामध्ये आशा सेविकांना आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे देण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच नव्याने नियुक्त आशा सेविकांचे स्वागत करून त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान आशा सेविकांच्या जीवनावर आधारित ‘आशा’ हा प्रेरणादायी चित्रपट दाखविण्यात आला, ज्यामुळे उपस्थित सेविकांना त्यांच्या कार्याबद्दल प्रेरणा मिळाली. या प्रसंगी Jhpiego संस्थेच्या आम्रपाली मॅडम, ज्ञानेश्वर सोनवणे, तालुका लसीकरण सनियंत्रक दिलावर वळवी, सुनंदन संस्थेचे दीपक सोनवणे तसेच लासुर व वैजापूर परिसरातील आशा सेविका व गटप्रवर्तक उपस्थित होते. या उपक्रमामुळे अति दुर्गम भागातील आरोग्य सेवेला बळकटी मिळणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
No comments