गडचिरोलीचे अप्पर पोलीस अधीक्षक जिल्ह्यातच एसपी म्हणून एम. रमेश यांनी पदभार घेतला, गडचिरोलीची मोठी जबाबदारी! ( गडचिरोली जिल्हा ) रणजित मस्...
गडचिरोलीचे अप्पर पोलीस अधीक्षक जिल्ह्यातच एसपी म्हणून एम. रमेश यांनी पदभार घेतला, गडचिरोलीची मोठी जबाबदारी!
( गडचिरोली जिल्हा ) रणजित मस्के प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
गडचिरोली जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी आज रोजी मावळते पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्याकडून पदभार स्वीकारला ते 2017 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून त्यांनी यापूर्वी गडचिरोली जिल्ह्यातच अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) म्हणून कार्यरत होते. त्यांना नक्षलवादी विरोधी अभियानाचा व इतर स्थानिक दांडगा असल्याने त्यांची जिल्ह्यातच पोलीस अधीक्षक पदी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. तर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांची कोल्हापूर पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती झाली आहे. निलोत्पल सर्वाधिक साडेतीन वर्ष जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिले आहे. एम. रमेश नोव्हेंबर 2023 मध्ये अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून गडचिरोली रुजू झाले होते. जवळपास तीन वर्ष हाच पदभार सांभाळला होता. काही महत्त्वाच्या चकमकींमध्ये स्वतः एम.रमेश सहभागी झाले होते. त्यांचा हाच अनुभव लक्षात घेता त्यांना पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

No comments