adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा तालुक्यात NCMC कार्डसाठी विशेष शिबिर; १० एप्रिल रोजी नागरिकांना नोंदणीची संधी

 चोपडा तालुक्यात NCMC कार्डसाठी विशेष शिबिर; १० एप्रिल रोजी नागरिकांना नोंदणीची संधी  चोपडा (प्रतिनिधी)  (संपादक -:- हेमकांत गायकवाड)  चौगाव...

 चोपडा तालुक्यात NCMC कार्डसाठी विशेष शिबिर; १० एप्रिल रोजी नागरिकांना नोंदणीची संधी 


चोपडा (प्रतिनिधी) 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 चौगाव ता.चोपडा येथे  दि. १० एप्रिल २०२६ रोजी एस.टी. सवलत कार्ड तसेच NCMC (National Common Mobility Card) कार्डसाठी विशेष नोंदणी शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. या शिबिराचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये प्रवाशांसाठी उपयुक्त ठरणारे NCMC कार्ड उपलब्ध करून देण्यात येणार असून, यामुळे एस.टी. बस प्रवास अधिक सुलभ व डिजिटल पद्धतीने करता येणार आहे. तसेच सवलत कार्डासाठी पात्र असलेल्या नागरिकांची नोंदणीही यावेळी करण्यात येईल.

सदर शिबिरामुळे स्थानिक नागरिकांना गावातच सुविधा उपलब्ध होणार असून, त्यांना शहरात जाण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे वेळ व खर्चाची बचत होणार आहे.

या उपक्रमासाठी अधिक माहितीसाठी श्री. विश्राम तेले सर यांच्याशी ९८२३९८५६३१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.

No comments