adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

ज्ञानमाता माहिती अधिकार प्रशिक्षण केंद्र, पुणे टीमची महाराष्ट्र पोलीस महासंचालक Sadanand Date सर यांच्यासोबत महत्वपूर्ण भेट

 ज्ञानमाता माहिती अधिकार प्रशिक्षण केंद्र, पुणे टीमची महाराष्ट्र पोलीस महासंचालक Sadanand Date सर यांच्यासोबत महत्वपूर्ण भेट   मुंबई प्रतिनि...

 ज्ञानमाता माहिती अधिकार प्रशिक्षण केंद्र, पुणे टीमची महाराष्ट्र पोलीस महासंचालक Sadanand Date सर यांच्यासोबत महत्वपूर्ण भेट  


मुंबई प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

ज्ञानमाता माहिती अधिकार प्रशिक्षण केंद्र, पुणे यांच्या टीमने आज मुंबई येथे आगमन करून, महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक मा. सदानंद दाते सर यांची नियोजित वेळेनुसार दुपारी ३.१५ वाजता सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान संस्थापक अध्यक्ष अब्राहम आढाव यांनी माहिती अधिकार कायद्याशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सुमारे पंधरा मिनिटे सखोल चर्चा केली.

या चर्चेमध्ये खालील प्रमुख मुद्दे मांडण्यात आले

आरटीआय कार्यकर्त्यांना आवश्यक संरक्षण प्रदान करणे

कार्यकर्त्यांवर दाखल होणाऱ्या खोट्या गुन्ह्यांवर नियंत्रण

आरटीआय कार्यकर्त्यांच्या कामकाजासाठी सुरक्षित व सक्षम वातावरण निर्माण करणे

राज्यातील पोलीस स्टेशनमधील जन माहिती अधिकारी व प्रथम अपील अधिकारी यांना नियमित प्रशिक्षण देणे

माहिती अधिकाराशी संबंधित कामासाठी स्वतंत्र पोलीस यंत्रणा स्थापन करणे

वरील सर्व मागण्या निवेदनाद्वारे सादर करण्यात आल्या.

यावर सकारात्मक प्रतिसाद देत मा. महासंचालकांनी लवकरच आवश्यक आदेश निर्गमित करण्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांनी “तुम्ही व्यापक जनहिताचे प्रश्न घेऊन आलात, हे अत्यंत प्रशंसनीय आहे” असे सांगत टीमचे अभिनंदन केले. चर्चा समाप्तीनंतर त्यांनी स्वतः उठून सर्व उपस्थितांशी हस्तांदोलन करून सन्मानपूर्वक स्वागत केले. या प्रसंगी पोलीस उपमहानिरीक्षक मोक्षदा पाटील मॅडम उपस्थित होत्या. तसेच सचिन भंडारी, गिरीश झगडे, सचिव अमर कामठे, बाळासाहेब मोडक, अनिल महाडिक, विलास शेडगे, रमेश बोराडे, राजू दरेकर, अमित कांबळे, श्रीकांत कावरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. या भेटीमुळे माहिती अधिकार कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य, ऊर्जा आणि आत्मविश्वास निर्माण झाला असून, भविष्यात जनहिताच्या लढ्यात अधिक बळ मिळणार आहे.

"जनहिताच्या प्रश्नांसाठी थेट महासंचालकांशी संवाद – RTI चळवळीला नवे बळ!"

No comments