adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शिऊरमध्ये त्रीसदस्यीय समितीची धडक एन्ट्री तक्रारदार समक्ष पाझर तलावाची चौकशी होणार थेट स्थळ पाहणीमुळे अनेकांचे धाबे दणाणले? ग्रामपंचायतीत दुपारी 2:30 ला चौकशीचा बिगुल व्हिडिओ शूटिंगसह पोलिस बंदोबस्तात चौकशीची मागणी

  शिऊरमध्ये त्रीसदस्यीय समितीची धडक एन्ट्री,   तक्रारदार समक्ष पाझर तलावाची चौकशी होणार   थेट स्थळ पाहणीमुळे अनेकांचे धाबे दणाणले? ग्रामपंचा...

 शिऊरमध्ये त्रीसदस्यीय समितीची धडक एन्ट्री,  तक्रारदार समक्ष पाझर तलावाची चौकशी होणार  थेट स्थळ पाहणीमुळे अनेकांचे धाबे दणाणले?

ग्रामपंचायतीत दुपारी 2:30 ला चौकशीचा बिगुल व्हिडिओ शूटिंगसह पोलिस बंदोबस्तात चौकशीची मागणी

निलंगा प्रतिनिधी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)

मौजे शिऊर, ता. निलंगा, जि. लातूर येथील गायरान जमिनीवरील पाझर तलाव बेकायदेशीररित्या बुजवून शासकीय जमिनीवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न समोर आला आहे. या प्रकरणी जिल्हा परिषद पंचायत विभाग, लातूर यांनी दखल घेत त्रिसदस्यीय चौकशी समितीची नियुक्ती केली असून दिनांक 29 मे 2026 रोजी दुपारी 2.30 वाजता प्रत्यक्ष स्थळ पाहणी व अर्जदारांसमक्ष चौकशी करण्यात येणार आहे.

शिऊर येथील पाझर तलावामध्ये हजारो ब्रास खडक व मुरूम टाकून तलाव बुजविण्यात आला आहे. तसेच शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून तेथे गुळ उद्योग सुरू करण्याचा प्रयत्न शिऊर दाजी यांनी केल्याची तक्रार करण्यात आली आहे.

या संदर्भात अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी यांनी संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच सदर पाझर तलावाची नोंद ग्रामपंचायत मालकी हक्कात करण्यात यावी, अन्यथा 8 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत आमरण उपोषणास बसणार असल्याचे निवेदन जिल्हा परिषद पंचायत विभाग, लातूर यांना देण्यात आले आहे.

या निवेदनाची गंभीर दखल घेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत विभाग) डी. बी. वाघ यांनी सात दिवसांत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सहाय्यक गट विकास अधिकारी गट-ब पंचायत समिती औसा, विस्तार अधिकारी (पंचायत) पंचायत समिती औसा आणि उपविभागीय अभियंता, लघु पाटबंधारे विभाग औसा यांची त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे.

ही समिती पाझर तलावाची मालकी, तलावावर अतिक्रमण झाले आहे का, अतिक्रमण निष्कासित करण्याची जबाबदारी कोणाची याबाबत संयुक्त पाहणी करून स्वयंस्पष्ट अहवाल पंचायत विभाग, जिल्हा परिषद लातूर यांच्याकडे सादर करणार आहे.

या संदर्भात सहाय्यक गट विकास अधिकारी शैलेंद्र बिराजदार यांनी श्री. शेख महेबुब नबीसान, श्री. शेखर चिखलचांदे (शाखा/कनिष्ठ अभियंता, जि.प. लपा./पापु. उपविभाग औसा) तसेच तक्रारदार सौदागर मोहम्मद रफी यांना 29 मे रोजी ग्रामपंचायत शिऊर येथे उपस्थित राहण्याचे पत्र दिले आहे.

शिऊर तलाव प्रकरणाला वेग; आज निर्णायक तपासणी

No comments