adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जळगाव मध्ये नियमांची ‘ऐशी-तैशी’! चक्क प्रकल्प संचालकांच्या दालनात रंगला वाढदिवसाचा केक; कारवाईची टांगती तलवार

 जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जळगाव मध्ये नियमांची ‘ऐशी-तैशी’! चक्क प्रकल्प संचालकांच्या दालनात रंगला वाढदिवसाचा केक; कारवाईची टांगती तलवार ...

 जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जळगाव मध्ये नियमांची ‘ऐशी-तैशी’! चक्क प्रकल्प संचालकांच्या दालनात रंगला वाढदिवसाचा केक; कारवाईची टांगती तलवार 


जळगाव प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 शासकीय कार्यालये ही जनतेच्या कामासाठी असतात की वैयक्तिक सोहळ्यांसाठी? असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे. जळगाव येथील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे (DRDA) प्रकल्प संचालक राजू लोखंडे यांनी आपल्या शासकीय दालनात चक्क वाढदिवसाचा केक कापून शासकीय नियमांना हरताळ फासल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते, अभ्यासक शासकीय यंत्रणा व योजना दिनेश कडू भोळे यांनी पुराव्यांसह तक्रार दाखल करत शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाची सुट्टी असतानाही, प्रकल्प संचालक राजू लोखंडे यांच्या शासकीय दालनात त्यांच्या वाढदिवसाचा जंगी सोहळा पार पडला. यावेळी ‘उमेद’ अभियानाचे जिल्हा व्यवस्थापक हरेश्वर भोई, वाहनचालक नरेंद्र निकम, शिपाई मुन्ना खाटीक यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी मिळून केक कापला आणि फोटो सेशनही केले. या सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

शासकीय नियमांचे सरळ उल्लंघन

महसूल व वन विभागाने २३ जून २०२५ रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार (आस्था ३/प्र क्र २०९/२०२५), शासकीय कार्यालयात वैयक्तिक समारंभ साजरे करण्यास सक्त मनाई आहे. तसेच ‘महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९’ नुसार, कार्यालयीन जागेवर अशा प्रकारचे वैयक्तिक कार्यक्रम करणे हा गंभीर गैरशिस्तीचा प्रकार मानला जातो.

तक्रारदार दिनेश भोळे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, “सामान्य नागरिक जेव्हा कामासाठी येतात, तेव्हा हे अधिकारी दालनात उपलब्ध नसतात. मात्र, वाढदिवसासाठी कार्यालयीन वेळेचा आणि जागेचा गैरवापर केला जातो.” भोळे यांनी पुढे असाही आरोप केला आहे की, प्रकल्प संचालक राजू लोखंडे आणि हरेश्वर भोई यांच्यावर ‘उमेद’ अभियानातील कथित भ्रष्टाचाराप्रकरणी यापूर्वीही तक्रारी आहेत, मात्र प्रशासन त्यांना पाठीशी घालत आहे. आता या वाढदिवस प्रकरणामुळे त्यांच्यावर विभागीय चौकशी आणि शिस्तभंगाची कारवाई होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments