adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

धरणगाव येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

  धरणगाव येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा  धरणगाव प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) धरणगाव : इंदिरा गांधी माध्यमिक व कनिष्ठ महाविद्या...

 धरणगाव येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा 


धरणगाव प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

धरणगाव : इंदिरा गांधी माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय तसेच आदर्श प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १ मे २०२६ रोजी ६७ वा महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात आदर्श माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक संदीपकुमार सोनवणे यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये संस्थेचे सचिव सी. के. पाटील, प्राचार्या सुरेखा पाटील, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बळवंत पाटील, आदर्श प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शशिकांत पाटील, पर्यवेक्षक ए. एस. पाटील तसेच बालवाडी विभागाच्या संचालिका अलका भावसार यांचा समावेश होता. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन किरण चव्हाण व फिलिप गावीत यांनी प्रभावीपणे केले. यावेळी ज्येष्ठ शिक्षक किरण चव्हाण यांनी सादर केलेल्या महाराष्ट्र गीताने उपस्थितांमध्ये उत्साह व अभिमानाची भावना जागृत केली.

या प्रसंगी महाराष्ट्र दिनाचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करण्यात आले. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान देण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला. संपूर्ण कार्यक्रम देशभक्तीच्या वातावरणात पार पडला.

No comments