adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

म्युनिसिपल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फैजपूरचा दहावीचा निकाल ७२.२२%; पारस चौधरी विद्यालयात प्रथम

 म्युनिसिपल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फैजपूरचा दहावीचा निकाल ७२.२२%; पारस चौधरी विद्यालयात प्रथम  इदू पिंजारी  फैजपूर : (संपादक -:- हेमकांत...

 म्युनिसिपल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फैजपूरचा दहावीचा निकाल ७२.२२%; पारस चौधरी विद्यालयात प्रथम 


इदू पिंजारी  फैजपूर :

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

फेब्रुवारी/मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या एस.एस.सी. (दहावी) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, फैजपूर येथील म्युनिसिपल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजने यंदाही उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. विद्यालयाचा एकूण निकाल ७२.२२ टक्के लागला असून गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

विद्यालयातील पारस सचिन चौधरी याने ८६.४० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांकावर शिवम विजय बोदडे आणि राजनंदिनी संतोष चव्हाण या दोन्ही विद्यार्थ्यांनी प्रत्येकी ८५.४० टक्के गुण मिळवत यश संपादन केले. तसेच दिव्याभारती विनोद तायडे हिने ८४.६० टक्के गुणांसह विद्यालयात तृतीय क्रमांक मिळवला.

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल फैजपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी अविनाश गांगोडे, नगराध्यक्षा सौ. दामिनी सराफ, उपनगराध्यक्षा, सर्व नगरसेवक व नगरसेविका, शिक्षण सभापती, शालेय समिती अध्यक्ष, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक वृंद तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत मिळवलेल्या या यशामुळे फैजपूर परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

No comments