adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सातारा एसपी चे पुरीगोसावी यांच्याकडून स्वागत; कायदा आणि सुव्यवस्थेला प्रथम प्राधान्य देणार !

 सातारा एसपी चे पुरीगोसावी यांच्याकडून स्वागत; कायदा आणि सुव्यवस्थेला प्रथम प्राधान्य देणार !   (सातारा जिल्हा) रणजित मस्के प्रतिनिधी. (संपा...

 सातारा एसपी चे पुरीगोसावी यांच्याकडून स्वागत; कायदा आणि सुव्यवस्थेला प्रथम प्राधान्य देणार ! 


 (सातारा जिल्हा) रणजित मस्के प्रतिनिधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 सातारा जिल्ह्याचे नूतन जिल्हा एसपी निखिल पिंगळे साहेब यांची आज रोजी सातारा पोलीस मुख्यालयातील त्यांच्या दालनामध्ये संभाजी पुरीगोसावी आणि आकाश पुरीगोसावी यांच्या उपस्थितीत नूतन जिल्हा एसपी निखिल पिंगळे साहेब यांचे स्वागत करीत त्यांना शुभेच्छा दिल्या. तत्कालीन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची सांगली पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाल्यानंतर राज्य गृह विभागाने निखिल पिंगळे यांची सातारा पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती केली होती. निखिल पिंगळे यांनी यापूर्वी गोंदिया लातूर जिल्ह्यात पोलीस अधीक्षक म्हणून तर पुणे शहरांतही आपल्या कामाची चांगलीच छाप पडली होती. तर मावळते पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी देखील सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक पदभार घेतल्यापासून नेहमीच प्रयत्नशील राहिले होते. आता सातारा पोलीस अधीक्षक म्हणून निखिल पिंगळे साहेब नव्याने रुजू झाले असून त्यांनी पदभार घेताच जिल्ह्यात आगळीवेगळी छाप पाडण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी पदभार घेताच जिल्ह्यात दोन-तीन धडक कारवाया करण्यात आल्या. त्यामुळे आता सातारा जिल्ह्यात त्यांच्या इंट्रीमुळे अवैध धंदे आणि इतर धंदेवाल्यांचे चांगलेच धाबे दणाणले असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नवे पोलीस अधीक्षक आता जिल्ह्यातील गुन्हेगारी चांगलीच मोडीत काढणार असे म्हणण्यात काय वावगे ठरणार नाही.

No comments