adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

आसेमं तर्फे १० मे रोजी सावदा येथे सामुहिक विवाह सोहळा अखंडित २९ वर्षे पुर्ण १८५० जोडपी विवाहबद्ध

 आसेमं तर्फे १० मे रोजी सावदा येथे सामुहिक विवाह सोहळा अखंडित २९ वर्षे पुर्ण १८५० जोडपी विवाहबद्ध    मुबारक तडवी रावेर  (संपादक -:- हेमकांत ...

 आसेमं तर्फे १० मे रोजी सावदा येथे सामुहिक विवाह सोहळा अखंडित २९ वर्षे पुर्ण १८५० जोडपी विवाहबद्ध  


 मुबारक तडवी रावेर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

आसेमं आदिवासी सेवा मंडळ संघटनेचे वतीने अखंडितपणे २९ व्या आदिवासी समाज सामुहिक विवाह सोहळा सावदा तालुका रावेर येथील नगरपालिका मंगल कार्यालय येथे आयोजित केला आहे गेल्या २८ वर्षांपासून आसेमं आदिवासी सेवा मंडळ संघटना या सोहळ्यात आदिवासी समाजातील गोरगरीब कष्टकरी कामगार निराधार वधूवरांना निःस्वार्थ रेशीमगाठी बांधत आहे आतापर्यंत १८५० वधू वर या संघटनेने आयोजित केलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात कोणतीही कसलीही अपेक्षा न ठेवता सामाजिक बांधिलकी व समाज उन्नतीचा उद्देश नजरेसमोर ठेवून विवाहबद्ध झाले असून हा सामुहिक विवाह सोहळा अविरत चालू ठेवण्याचा आसेमं आदिवासी सेवा मंडळ संघटनेचा संकल्प व मानस आहे.यासोबत या सोहळ्यात समाजातील विविध क्षेत्रातील घटकांना त्यांनी केलेल्या सामाजिक शैक्षणिक संस्था समाजसेवा करणाऱ्या तसेच विशेष प्राविण्य मिळवलेल्या जेष्ठ नागरिक तरुण युवा युवती ना गुणवत्ता गुणवंत गुणगौरव तसेच जेष्ठ नागरिक उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचारी समाजसेवक यांना पुरस्कार प्रदान मान सन्मान सत्कार करुन गौरविण्यात येते आसेमं आदिवासी सेवा मंडळ संघटना समाज सेवा सामाजिक बांधिलकी समाजहितासाठी सदैव विविध उपक्रमांचे आयोजन करीत अविरतपणे कार्यरत आहेत 

१०में रविवार रोजी सावदा येथे आसेमं आदिवासी सेवा मंडळ संघटनेचे वतीने आयोजित केलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात जास्तीत जास्त गरजू उप वर वधू यांनी विवाह नोंदणी करून अनाठायी खर्च वेळ पैशांची बचत करावी या सामुहिक विवाह सोहळ्यात विवाह सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन आसेमं आदिवासी सेवा मंडळ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजु बिर्हाम तडवी जिल्हाध्यक्ष मुबारक उर्फ राजू तडवी प्रदेश अध्यक्ष कामील तडवी अनिल तडवी इरफान तडवी सह आसेमं महापरिवार तर्फे करण्यात आले आहे

या सामुहिक विवाह सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून आमदार चंद्रकांत भाऊ पाटील मुक्ताईनगर व आमदार अमोल भाऊ जावळे रावेर यावल अध्यक्षस्थानी माजी आमदार शिरीष दादा चौधरी  विशेष उपस्थिती फैजपूर उपविभागीय अधिकारी बबनराव काकडे साहेब, अनिल भाऊ चौधरी, राजेश भाऊ वानखेडे सपोनि विशाल पुंडलिक पाटील नगराध्यक्ष रेणुका पाटील शेख हारुण सेठ उपनगराध्यक्ष फिरोज खान धनंजय चौधरी आदिसह मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे

No comments