adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

संरक्षक कठड्याविना पूल अपघातास निमंत्रण चुण्याच्या वळणाजवळील पुलावर दिशादर्शक फलक व गतिरोधकांचीही कमतरता

 संरक्षक कठड्याविना पूल अपघातास निमंत्रण नांदगाव कोहळी रस्त्यावर चुण्याच्या वळणाजवळील पुलावर दिशादर्शक फलक व गतिरोधकांचीही कमतरता   जयवंत हा...

 संरक्षक कठड्याविना पूल अपघातास निमंत्रण

नांदगाव कोहळी रस्त्यावर चुण्याच्या वळणाजवळील पुलावर दिशादर्शक फलक व गतिरोधकांचीही कमतरता 


 जयवंत हागोटे, त्र्यंबकेश्वर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

नांदगाव कोहोळी-खरवळ मार्गावरील वर्दळीच्या रस्त्यावर असलेल्या नाल्याच्या पुलाला संरक्षणात्मक कठडे नसल्याने हा पूल अपघातास निमंत्रण देत असल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे या पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असून, पावसाळ्यात हा पूल अधिक धोकादायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

वाहतुकीच्या सोयीसाठी नदी-नाल्यांवर पूल उभारले जातात तसेच सुरक्षेच्या दृष्टीने कठडे बसविले जातात. मात्र, नांदगाव कोहोळी रस्त्यावरील चुण्याच्या वळणाजवळील पुलाला दोन्ही बाजूंनी कठडे नसल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. अलीकडेच वाहनावरील नियंत्रण सुटल्याने एक भरधाव कार पुलावरून खाली कोसळल्याची घटना घडली. या अपघातात प्रवासी किरकोळ जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

सदर पूल वळणाच्या ठिकाणी असल्याने वाहनचालकांना विशेष खबरदारी घ्यावी लागते. मात्र, या ठिकाणी दिशादर्शक फलक, इशारा चिन्हे किंवा गतिरोधक नसल्याने अनेक वाहने भरधाव वेगाने जातात आणि अपघाताची शक्यता वाढत आहे. यापूर्वीही अनेक दुचाकीस्वार घसरून पुलावर पडल्याच्या घटना घडल्या आहेत.

पावसाळ्यात ओढ्यात पाण्याचा प्रवाह वाढत असल्याने हा पूल नागरिकांसाठी जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे संबंधित प्रशासनाने तातडीने पुलावर संरक्षणात्मक कठडे बसवून आवश्यक सुरक्षाव्यवस्था करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

No comments