adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जळगाव सहकार परिषदेत १९ मे रोजी राज्याच्या नवीन सहकार धोरणावर मंथन ; जिल्हाध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांची माहिती

जळगाव सहकार परिषदेत 19 मे रोजी राज्याच्या नवीन सहकार धोरणावर मंथन ; जिल्हाध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांची माहिती इदू पिंजारी फैजपूर  (संपादक -:...

जळगाव सहकार परिषदेत 19 मे रोजी राज्याच्या नवीन सहकार धोरणावर मंथन ; जिल्हाध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांची माहिती


इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

फैजपूर:-  सहकार भारती जळगाव जिल्हा व बळवन्त सहकारी पतसंस्था यांचे संयुक्त विद्यमाने दि 19 मे रोजी दुपारी 3 वा सहकार परिषदेचे आयोजन केले असल्याची माहिती सहकार भारती जिल्हा अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांनी दिली  ही परिषद नियोजन भवन जळगाव येथे होणार आहे केंद्र सरकारने ने नुकतेच देशभरात नवीन सहकार धोरण राबविण्याचे ठरविले आहे  या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने सुद्धा नवीन सहकार धोरण तयार करण्याचे निश्चित केले आहे  यासाठी  महाराष्ट्रातील अनुभवी व तज्ञांचे सह धोरण समिती नियुक्त केली आहे या नवीन सहकार धोरण बाबत प्रत्येक जिल्ह्यात सविस्तरपणे चर्चा करणे साठी सहकार भारती तर्फे चर्चा सत्र आयोजित करीत आहे  या परिषदेत जळगाव जिल्ह्यातील  सहकारी संस्था चे पदाधिकारी जिल्हा बँक इतर सर्व सहकारी बँक जिल्हा दुधसंघ व दुध सोसायटी वि का सोसायटी पतसंस्था  इतर सर्व सहकारी संस्था चेअरमन व संचालक यांची उपस्थिती राहणार आहे 

परिषदेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून सतीश मराठे संचालक भारतीय रिझर्व्ह बँक व विवेक जुगाडे प्रदेश महामंत्री  हे दोन्ही मान्यवर राज्यसरकार नवीन सहकार धोरण समितीचे सदस्य आहेत यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून विशेष मान्यवर संजय पवार अध्यक्ष जे डी सि सि  बँक आ मंगेश चव्हाण अध्यक्ष जिल्हा दूध संघ दिलीप पाटील राष्ट्रीय संघटन प्रमुख सहकार भरती सौ रेवती ताई शेंदूरणीकर,  राष्ट्रीय महिला प्रमुख  रोहित निकम उपाध्यक्ष मार्केटिंग   फेडरेशन शशिकांत साळुंखे अध्यक्ष पतसंस्था फेडरेशन सतीश मदाने अध्यक्ष जळगाव जनता बँक गौतम बळसाने जिल्हा उपनिबंधक प्रदीप देशमुख अध्यक्ष जिल्हा सहकारी बोर्ड चंद्रहास भाई गुजराथी बँक असोसिएशन अध्यक्ष संजय बिर्ला  शरद जाधव संघटन मंत्री यासह जिल्ह्यातील अनुभवी सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहे उपस्थिती चे आवाहन अध्यक्ष नरेंद्र नारखेडे महानगर अध्यक्ष शोभाताई पाटील जिल्हा महामंत्री शशिकांत बेहेडे महानगर चे महामंत्री प्रमोद नगरकर बाळवन्त सह पतसंस्था चेअरमन राधेश्याम बजाज व्हा चे सविता ताई नाईक व्यवस्था पक जयदीप शहा व सहकार भारती व बळ वन्त सहकारी पतसंस्था कार्यकारिणी यांनी केले आहे

No comments