नालासोपारात मोठा राजकीय भूकंप; रुचिता नाईक, वैभव पवार यांचा बहुजन विकास आघाडीत प्रवेश शेकडो कार्यकर्त्यांसह तीन नवीन रुग्णवाहिकांचे लोकार्प...
नालासोपारात मोठा राजकीय भूकंप; रुचिता नाईक, वैभव पवार यांचा बहुजन विकास आघाडीत प्रवेश
शेकडो कार्यकर्त्यांसह तीन नवीन रुग्णवाहिकांचे लोकार्पण; शक्तिप्रदर्शनाने राजकीय वर्तुळात चर्चा
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
नालासोपारा : नालासोपारा परिसरात रविवारी मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या असून शिवसेना-भाजपला खिंडार पाडत रुचिता नाईक आणि वैभव पवार यांनी शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह बहुजन विकास आघाडीत जाहीर प्रवेश केला. यावेळी तीन नवीन रुग्णवाहिकांचे लोकार्पण करत भव्य शक्तिप्रदर्शन करण्यात आले.
लोकनेते हितेंद्र ठाकूर, युवा आमदार क्षितिज ठाकूर, महापौर अजीव पाटील, उपमहापौर मार्शल लोपीस यांच्या हस्ते तसेच ज्येष्ठ नेते हेमंत म्हात्रे (बंधू) यांच्या मार्गदर्शनाखाली हा पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमामुळे स्थानिक राजकारणात बहुजन विकास आघाडीची ताकद अधिक भक्कम झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
कार्यक्रमात उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. वसई-विरारचा सर्वांगीण विकास करण्याची क्षमता बहुजन विकास आघाडीत असल्याचा विश्वास व्यक्त करत रुचिता नाईक यांनी हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर आणि महापौर अजीव पाटील यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. “फक्त रील बनवणारे नव्हे, तर प्रत्यक्ष जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून काम करणारे नेतेच खरे रील स्टार असतात,” असे त्या म्हणाल्या.
यावेळी स्थायी समिती अध्यक्ष प्रवीण शेट्टी, माजी नगरसेवक अतुल साळुंखे, माजी नगरसेवक किशोर पाटील, युवा अध्यक्ष नवीन वाघचौडे, नवनाथ पगारे, अभिषेक हटकर, संजीव कदम, रोहन डिसोझा, राजेंद्र खुळे, रोहित डिसोझा, किशोर कारेकर, गणेश मुणगेकर, महेश निकम, जया गुप्ता यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments