adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मलकापूर शहर कार्याध्यक्षपदी अमोल टप यांची निवड

 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मलकापूर शहर कार्याध्यक्षपदी अमोल टप यांची निवड  अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मलकापूर:-  स...

 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मलकापूर शहर कार्याध्यक्षपदी अमोल टप यांची निवड 


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मलकापूर:-  समाजसेवेचा वसा हाती घेत पंचक्रोशीत आपल्या नावाचा वेगळाच ठसा उमटविणारे युवा नेतृत्व अमोल टप यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मलकापूर शहर कार्याध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.ना.श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा.खा.श्री प्रफुलभाई पटेल,मा.श्री. प्रांताध्यक्ष मा.खा.श्री सुनीलजी तटकरे, बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री आबा पाटील यांचे विचार तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी पक्षाला अधिक बळकट करण्यासाठी अमोल टप यांची बुलडाणा जिल्हाध्यक्ष नाझेर काझी, जिल्हा कार्याध्यक्ष प्रसाद भाऊ जाधव यांच्या उपस्थित नियुक्ती करण्यात आली.अमोल टप यांच्या नियुक्तीने कार्यकर्ता मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होऊन त्यांचा माध्यमातून पक्षाला युवा कार्यकर्त्यांची मोठी बळकट टीम मिळेल. जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असून मलकापूर शहर पक्ष बांधणीसाठी कार्यकर्त्यांशी संवाद साधत दौरा सुरू राहील नागरिकांना काही काम असल्यास माझा 9763519014 नंबरवर संपर्क साधावा आपल्या सेवेत मी सदैव तत्पर राहील असे अमोल टप यांनी कळविले.

No comments