adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

निकेतन कदम यांनी अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला; गुन्हेगारांवर करडी नजर राहणार!

 निकेतन कदम यांनी अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला; गुन्हेगारांवर करडी नजर राहणार!   रणजित मस्के (अमरावती जिल्हा ) प्रति...

 निकेतन कदम यांनी अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला; गुन्हेगारांवर करडी नजर राहणार! 


 रणजित मस्के (अमरावती जिल्हा ) प्रतिनिधी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 अमरावती ग्रामीणचे नूतन पोलीस अधीक्षक निकेतन बन्सीलाल कदम यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. त्यांनी यापूर्वीचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्याकडून कार्यभार स्वीकारला, तर विशाल आनंद यांची धुळे पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. नूतन पोलीस अधीक्षक अनिकेत कदम यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं की ग्रामीण भागामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नेहमीच प्राधान्य राहील, तुम्ही सुद्धा कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल, तसेच गुन्हेगारांवर प्रशासनांची करडी नजर राहील, त्यामुळे अमरावती ग्रामीण भागातही आता अवैध धंदे वाल्यांचे चांगलेच धाबे दणाणले असल्याचे बोलले जात आहे. पोलीस अधीक्षक कदम यांच्या नव्या एन्ट्रीमुळे अमरावती ग्रामीण पोलीस दलात आता नवीन नेतृत्वाची सुरुवात झाली आहे. तर विद्यमान पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनीही अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून पदभार घेतल्यापासून नेहमीच प्रयत्नशील दिसून आले त्यांच्या कार्यकाळात देखील अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे उघडकीस आणून त्यांनी जिल्ह्यात आपल्या कामाची आगळीवेगळी छाप पडत नेहमीच कायदा आणि सुव्यवस्था चांगलाच ठेवला होता.

No comments