नान्नज येथील अण्णाभाऊ साठेनगरमध्ये हातपंप दुरुस्ती; पाणीटंचाईवर तात्पुरता दिलासा नान्नज प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) नान्नज:- अण...
नान्नज येथील अण्णाभाऊ साठेनगरमध्ये हातपंप दुरुस्ती; पाणीटंचाईवर तात्पुरता दिलासा
नान्नज प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
नान्नज:- अण्णाभाऊ साठेनगर परिसरात निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर गावातील बंद पडलेला हातपंप तातडीने दुरुस्त करण्यात आला असून, त्यामुळे ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ग्रामपंचायत नान्नजचे ग्रामपंचायत अधिकारी जी. एस. पवार यांनी परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत त्वरित कार्यवाही केली. त्यांच्या पुढाकाराने दुरुस्तीचे काम जलदगतीने पूर्ण करण्यात आले. यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद अहिल्यानगर येथील कर्मचाऱ्यांनी तांत्रिक सहकार्य करत हातपंप पुन्हा कार्यान्वित केला.
दुरुस्तीच्या कामावेळी अण्णाभाऊ साठेनगर परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनोप राजू साठे, महादेव अरुण साठे, संदीप साठे, किशोर साठे, विकास साठे, अमोल साठे, राजेंद्र विठ्ठल साठे, आकाश साठे, इस्माईल कुरेशी यांसह अनेक नागरिकांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त झाले होते. अशा परिस्थितीत प्रशासनाने दाखवलेली तत्परता कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली असून, या कार्यवाहीमुळे परिसरातील पाणी समस्या काही प्रमाणात कमी झाली आहे.

No comments