adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपड्यातील शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करा- भाजप महिला जिल्हाध्यक्ष संध्या महाजन यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे मागणी

 चोपड्यातील शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करा- भाजप महिला जिल्हाध्यक्ष संध्या महाजन यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे मागणी  ...

 चोपड्यातील शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करा- भाजप महिला जिल्हाध्यक्ष संध्या महाजन यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे मागणी 


चोपडा प्रतिनिधी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 शासकीय जमिनीवरील 1 जानेवारी 2011 पूर्वीचे निवासी अतिक्रमणे नियमित करण्याबाबतच्या शासनाच्या धोरणाला अनुसरून शहरातील 2000 पेक्षा जास्त घरे हे शासकीय जमिनीवर अतिक्रमित निवासी असून त्यांना नियमित करण्यात यावे. याबाबत नगरसेविका संध्या महाजन यांनी मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांना निवेदन दिले आहे. 

    राज्यातील गरीब व गरजू कुटुंबांना हक्काच्या निवारा मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण धोरण जाहीर केले आहेत.त्यानुसार शासकीय जमिनीवरील 1 जानेवारी 2011 किंवा त्यापूर्वी झालेली निवासी अतिक्रमणे विशिष्ट अटींच्या अधीन राहून नियमित करण्यात बाबत शासनाने निर्णय घेतलेला आहे.  त्याबाबत अर्ज स्विकृती, छाननी, मोजणी प्रक्रिया, हरकती व अंतिम मंजुरी याबाबत  मुख्याधिकारी हे प्रमुख आहेत.

यात शहरातील रंगराव आबा नगर, फुले नगर, अरुण नगर, साने गुरुजी,समता नगर, इंदिरा नगर, गौतम नगर, सह इतर शासकीय जागेवर निवासी अतिक्रमण आहे. साधारणतः 1800 पेक्षा जास्त घरे आहेत. सदर नागरिक हे शासनाच्या शासकीय जमिनीवरील 1 जानेवारी 2011 पूर्वीचे निवासी अतिक्रमणे नियमित करण्याबाबत या योजनेचे पात्र लाभार्थी असुन सदर रहिवासी यांचे अर्ज स्विकृती व योजनेचा लाभ होणेकामी  नगरसेविका तसेच भाजप महिला जिल्हाध्यक्ष संध्या महाजन यांनी मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांना निवेदन दिले. यावेळी नरेश महाजन उपस्थित होते.

No comments