adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

म्युनिसिपल हायस्कूल, फैजपूरचा एच.एस.सी. निकाल दैदीप्यमान; प्रणाली कोष्टी प्रथम

 म्युनिसिपल हायस्कूल, फैजपूरचा एच.एस.सी. निकाल दैदीप्यमान; प्रणाली कोष्टी प्रथम  इदू पिंजारी फैजपुर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजपूर : म्...

 म्युनिसिपल हायस्कूल, फैजपूरचा एच.एस.सी. निकाल दैदीप्यमान; प्रणाली कोष्टी प्रथम 


इदू पिंजारी फैजपुर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

फैजपूर : म्युनिसिपल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, फैजपूरने इयत्ता १२वी (एच.एस.सी.) परीक्षेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात उल्लेखनीय यश संपादन करत आपल्या शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. फेब्रुवारी/मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवत फैजपूर शहराच्या नावलौकिकात भर घातली आहे.

विज्ञान शाखेत प्रणाली किशोर कोष्टी हिने ५३५ गुण (८९.१७%) मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. चिराग अनिल नारखेडे (५२० गुण, ८६.६७%) द्वितीय तर भाग्येश जितेंद्र राणे (५१४ गुण, ८५.६७%) तृतीय क्रमांकावर राहिले.

कला शाखेत पुनम प्रमोद कोळी (३६५ गुण, ६०.८३%) प्रथम, मानसी शैलेश जैन (३६४ गुण, ६०.६७%) द्वितीय आणि प्रेम दिनेश बारेला (३३२ गुण, ५५.३३%) तृतीय क्रमांकावर राहिले.

वाणिज्य शाखेत हेतल प्रशांत पटेल (४०२ गुण, ६७.००%) प्रथम, सोनाली अनिल शिवलकर (३९७ गुण, ६६.१७%) द्वितीय तर ज्ञानेश्वर अजय तेली (३७८ गुण, ६३.००%) तृतीय आला.

शाळेचा एकूण निकाल ८३.९१ टक्के लागला असून विज्ञान शाखेचा ९८.७५%, कला शाखेचा ४८.४८% आणि वाणिज्य शाखेचा ८३.३३% निकाल लागला आहे.

या यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकवृंदाचे मुख्याध्यापकांनी कौतुक केले असून फैजपूर व परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तसेच फैजपूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक-नगरसेविका व मुख्याधिकारी यांनीही सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments