adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरमधील सम्राट बुद्ध विहार येथे बौद्ध जयंती साजरी

 फैजपूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरमधील सम्राट बुद्ध विहार येथे बौद्ध जयंती साजरी   इदू पिंजारी फैजपूर  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजपू...

 फैजपूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरमधील सम्राट बुद्ध विहार येथे बौद्ध जयंती साजरी  


इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

फैजपूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरमधील सम्राट बुद्ध विहार येथे बौद्ध जयंती साजरी करण्यात आली. सुरवातीला बौद्ध ट्रस्ट चे चेअरमन श्री संतोष मेंढे यांचे हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना फुल हार घालुन तथागत भगवान गौतम यांचे मूर्ती समोर फुले वाहुन व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना फुल हा करून वंदन करण्यात आले. बौद्धाचार्य बी.डी महाले सर यांनी व सर्व उपासक व‌ उपासीका यांनां समुदायिक बुद्ध वंदना घेऊन आयु.अशोक भालेराव साहेब समाजसेवक तथा धम्मदुत म्हणून यांनी बुद्ध जन्म कथा सर्वांन समोर सांगुन बुध्दाच्या जिवनावरील यथोचित असे घडलेले प्रकार अनेक प्रसंग सागीतले. तसेच आज देशाला सर्व समाजाला बुध्द विचारांची आवश्यकता आहे बुध्दांनी मानवाच्या कल्याणासाठी जो मार्ग सांगितला समानता, मैत्री, अहिंसा,प्रेम, सदाचार,सदभावना या मार्गाची नितांत गरज आहे.

बुद्ध जयंतीनिमित्त निमित्त सर्व उपासक व उपासीका बौध्द बविहारात उपस्थित होते, महाले सर यांनी सुध्दा पाली भाषेतील ज्या गाथा आहेत त्यांचे मराठी भाषणात विश्लेषण  अनुवाद करून प्रबोधन केले. या कार्यक्रमाला बौध्द पंच ट्रस्ट चे चेअरमन संतोष मेंढे, पदाधिकारी युवराज गाढे, चंद्रकुमार मेंढे,  तसेच सामाजिक कार्यकर्ते व बौद्ध मडळी अशोक इच्छाराम व धनराज मेढे नितीन मेंढे, भुषण गबा मेंढे, चंद्रमणी एकनाथ मेंढे, चंद्र मणी सोनु मेंढे, सुरेश मेंढे सर, विकी मेढे, योगेश मेंढे, उमेश बोदडे, मेश्राम बौद्धचार्य, महिला वसूंनधरा मेंढे व इतर महिला उपस्थित होत्या. शेवटी सर्वांना खिरदान म्हणून प्रसाद देण्यात आला. हा सर्व कार्यक्रम बौद्ध पंच ट्रस्ट यांचेकडून आयोजित करण्यात आला. शेवटी संतोष मेंढे चेअरमन यांनी आभार मानले व शरणतय घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

No comments