adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कस्तुरबा माध्यमिक विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक निलेश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षकसेवा सन्मान जाहीर

 कस्तुरबा माध्यमिक विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक निलेश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षकसेवा सन्मान जाहीर   चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हे...

 कस्तुरबा माध्यमिक विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक निलेश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षकसेवा सन्मान जाहीर  


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

      चोपडा येथील कस्तुरबा माध्यमिक विद्यालयातील शिक्षक श्री निलेश पाटील यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील समर्पित कार्याचा गौरव करण्यात आला आहे शिक्षण फाउंडेशन महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र शिक्षक पॅनल यांच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवा सन्मान त्यांना शिर्डी येथे प्रदान करण्यात आला 

शिर्डी येथे 12 मे रोजी आयोजित एका विशेष सोहळ्यात सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांच्या हस्ते आणि प्रसिद्ध कवी रोहित शिंगे व प्रसिद्ध कवयित्री गुंजन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री निलेश पाटील यांनी पुरस्कार आपल्या पत्नीसह स्वीकारला.

शिक्षण क्षेत्रातील नाविन्यपूर्ण प्रयोग विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न आणि सामाजिक बांधिलकी म्हणून केलेल्या कार्याची दखल घेऊन श्री निलेश पाटील यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली

श्री निलेश पाटील यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष  आदरणीय भैयासाहेब  ऍड.संदीप सुरेश पाटील व सचिव  आदरणीय  ताईसाहेब स्मिता संदीप पाटील ,पदाधिकारी मुख्याध्यापक ,शिक्षक सहकारी , निरीक्षक समिती, आणि परिसरातील पालकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे हा पुरस्कार म्हणजे गुणवत्तेवर पडलेली मानाची मोहोर असल्याची भावना व्यक्त होत आहे  

हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून माझ्या शाळेतील विद्यार्थी आणि सहकाऱ्यांच्या प्रेमाचे प्रतीक आहे यामुळे भविष्यात अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळालेली आहे.

No comments