अंतुर्ली ता. मुक्ताईनगर येथे ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयात श्री संत शिरोमणी संत भीमा भोई यांची जयंती उत्साहात साजरी किरण धायले मुक्ताईनगर (...
अंतुर्ली ता. मुक्ताईनगर येथे ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयात श्री संत शिरोमणी संत भीमा भोई यांची जयंती उत्साहात साजरी
किरण धायले मुक्ताईनगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयात श्री संत शिरोमणी संत भीमा भोई यांच्या 178 व्या जयंतीनिमित्त त्यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करताना वाचनालयाचे अध्यक्ष एस ए भोई, उपाध्यक्ष शरद तुकाराम महाजन, भाऊराव महाजन, अनिल वाडीले,विवेक कुलकर्णी , बी एस.वानखेडे,लहू भोई,शेख भैय्या शे.करीम, किरण धायले,शांताराम महाजन वाचक समाज बांधव व मान्यवर उपस्थित होते .
याप्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष एस ए भोई यांनी सांगितले की,श्री संत शिरोमणी संत भीमा भोई यांनी जगाच्या कल्याणासाठी स्वतःचे आयुष्य वेचले जगातील दुःखी लोकांचे दुःख पाहून माझे जीवन जरी नरकात गेले तरी चालेल पण या जगाचा उद्धार होऊ द्या असे महान कवी संत भीमा भोई. आज आपण कमीत कमी आपल्या समाजाच्या आपल्या भविष्यासाठी एकत्र येऊया अज्ञानाचा अंदाज मिटवून शिक्षण ,शक्ती आणि रोजगाराच्या बळावर एक जागरूक सक्षम आणि स्वाभिमानाने समाज घडवूया. अज्ञान, अंधश्रद्धा आणि निरर्थक कर्मकांड मध्ये न अडकता समाज जागृती करूया.
शोषित वंचित आणि शिक्षणापासून दूर राहिलेल्या घटकांपर्यंत ज्ञान पोचवू आणि समतावादी समाज निर्माण करूया, जातीभेदाचे निर्मूलन करा स्त्री शिक्षणाचा आणि सन्मानाचा पुरस्कार करा हाच संत भीमा भोई यांच्या जयंतीचा मुख्य उद्देश त्यांच्या पावन स्मृतीस आणि क्रांतिकारी विचारास विनम्र अभिवादन

No comments