adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

एनसीएमसी स्मार्ट कार्डच्या नावाखाली सामान्य जनतेची लूट?₹१५० रिचार्जवर कार्डात जमा झाले फक्त ₹१३६.६१; सुविधा शुल्क व जीएसटी मुळे प्रवाशांत संताप

  एनसीएमसी स्मार्ट कार्डच्या नावाखाली सामान्य जनतेची लूट?₹१५० रिचार्जवर कार्डात जमा झाले फक्त ₹१३६.६१; सुविधा शुल्क व जीएसटी मुळे प्रवाशांत ...

 एनसीएमसी स्मार्ट कार्डच्या नावाखाली सामान्य जनतेची लूट?₹१५० रिचार्जवर कार्डात जमा झाले फक्त ₹१३६.६१; सुविधा शुल्क व जीएसटी मुळे प्रवाशांत संताप





चंद्रकांत पाटील चोपडा तालुका प्रतिनिधी :-

(संपादक :- हेमकांत गायकवाड)


राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी सुरू करण्यात आलेल्या एनसीएमसी (स्मार्ट कार्ड) योजनेवर आता सामान्य नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. ₹१५० चे रिचार्ज केल्यानंतर प्रत्यक्ष कार्ड बॅलन्समध्ये फक्त ₹१३६.६१ जमा झाल्याची पावती समोर आली आहे. उर्वरित रकमेपैकी ₹११.३५ सुविधा शुल्क तर ₹२.०४ जिएसटी आकारण्यात आल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

सदर व्यवहार एनडीएसएल पेमेन्ट्स बँक मार्फत युपीआयद्वारे करण्यात आला असून व्यवहार यशस्वी झाल्याची नोंद पावतीत आहे. मात्र,सामान्य प्रवाशांना कोणतीही अतिरिक्त सुविधा न देता अशा प्रकारे वेगवेगळ्या शुल्कांच्या माध्यमातून आर्थिक भार टाकला जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

“स्मार्ट कार्ड”च्या नावाखाली महाराष्ट्रातील जनतेकडून पैसे वसूल करून खासगी कंपन्यांचे पोट भरण्याचे काम सुरू असल्याची टीका नागरिकांमध्ये होत आहे.शासनाने तात्काळ या शुल्क संरचनेचा पुनर्विचार करून सामान्य जनतेला दिलासा द्यावा,अशी मागणीही पुढे येत आहे..

No comments