खाकीचा गौरव..! पोलीस हवालदार राजू सुद्रिक यांचा पोलीस 'महासंचालक सन्मानचिन्हा'ने गौरव..एसपी सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते सन्मान..! ...
खाकीचा गौरव..! पोलीस हवालदार राजू सुद्रिक यांचा पोलीस 'महासंचालक सन्मानचिन्हा'ने गौरव..एसपी सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते सन्मान..!
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर:- राज्यातील पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि अंमलदारांना दिला जाणारा प्रतिष्ठेचा 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह' (DG Insignia) पुरस्कार अहिल्यानगर पोलीस दलातील पोलीस हवालदार श्री. राजू आप्पासाहेब सुद्रिक यांना जाहीर झाला आहे.त्यांच्या या यशाबद्दल जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक कार्यालयाकडून सन २०२५ या वर्षासाठीचे सन्मानचिन्ह नुकतेच घोषित करण्यात आले.यामध्ये राज्यभरातील ८०० पोलीस अधिकारी व अंमलदारांचा समावेश आहे.श्री.राजू अप्पा साहेब सुद्रिक यांनी अहिल्यानगर पोलीस दलात कार्यरत असताना गेल्या सतत १५ वर्षांपासून अत्यंत उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. त्यांचा उल्लेखनीय सेवा अभिलेख,उत्तम प्रशासकीय कार्यक्षमता आणि कर्तव्याप्रती असलेली निष्ठा लक्षात घेऊन त्यांना या सन्मानाने गौरविण्यात आले आहे.पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पत्राद्वारे सुद्रिक यांचे कौतुक करताना म्हटले की, "आपल्या या उत्तम कामगिरीबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन.भविष्यात आपण अशीच उल्लेखनीय कामगिरी पार पाडाल, अशी मला आशा आहे."सध्या श्री. राजू आप्पा साहेब सुद्रिक हे एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे, अहिल्यानगर येथे पोलीस हवालदार (ब.नं. ३४५) म्हणून कार्यरत आहेत.त्यांना हा बहुमान मिळाल्याबद्दल पोलीस दलातील सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments