adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूर येथे स्व.अजितदादा पवार चषक अंतिम सामन्यात वसीम जनाब क्रिकेट क्लब ठरला विजेता

 फैजपूर येथे स्व.अजितदादा पवार चषक अंतिम सामन्यात वसीम जनाब क्रिकेट क्लब ठरला विजेता  इदू पिंजारी फैजपूर  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) येथे ...

 फैजपूर येथे स्व.अजितदादा पवार चषक अंतिम सामन्यात वसीम जनाब क्रिकेट क्लब ठरला विजेता 


इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

येथे आयोजित करण्यात आलेल्या स्वर्गीय अजित दादा पवार चषक नाईट क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वसीम जनाब क्रिकेट क्लबने शानदार विजय मिळवत चषकावर आपले नाव कोरले. अंतिम सामना वसीम जनाब क्रिकेट क्लब आणि याराना क्रिकेट क्लब यांच्यात अत्यंत रोमांचक वातावरणात पार पडला.

संपूर्ण सामन्यात दोन्ही संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. मात्र निर्णायक क्षणी दमदार फलंदाजी व अचूक गोलंदाजीच्या जोरावर वसीम जनाब क्रिकेट क्लबने बाजी मारत अंतिम विजेतेपद पटकावले. अंतिम सामना पाहण्यासाठी हजारोच्या संख्येने क्रिकेट प्रेमींनी मोठी गर्दी केली होती. विजेता संघाला मोठी रक्कम यावेळी बक्षीस उपस्थित   मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली 

यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून राजेश भाऊ वानखेडे, माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक शे कुर्बान शे करीम  आरिफ भाऊ, सुनील माखिजा, फारूक भाई, कैलास बालानी तसेच वसीम जनाब क्रिकेट क्लबचे सर्व खेळाडू उपस्थित होते. विजेत्या संघाचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे परिसरातून कौतुक करण्यात आले यास्पर्धा मुन्सिपल  हायस्कूलच्या भव्य स्टेडियम मध्ये आयोजित करण्यात आले होते यावेळी हजारोच्या संख्येने क्रिकेटप्रेमी तसेच युवक चाहते उपस्थित होते

No comments