फैजपुरात कुल हिंद मुशायरा ; नामांकित शायरांनी रंगवली संध्या इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजपूर येथे शहीद हजरत टीपू सु...
फैजपुरात कुल हिंद मुशायरा ; नामांकित शायरांनी रंगवली संध्या
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर येथे शहीद हजरत टीपू सुलतान (र.अ.) यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेला “कुल हिंद मुशायरा – एक शाम हजरत टिपू सुलतान के नाम” हा कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि शायरीच्या रंगतदार वातावरणात संपन्न झाला. देशातील नामांकित शायरांनी आपल्या दमदार आणि भावपूर्ण शायरीने उपस्थित रसिकांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे प्रभावी संचालन करीम सर यांनी केले, तर शमा फरोझीचा मानही त्यांच्या हस्ते पार पडला. मुशायऱ्याची सदारत शेख अब्दुल्ला रसूल यांनी भूषवली. फैजपूर शहरासह परिसरातील शायरीप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संपूर्ण परिसर उर्दू अदब, साहित्य आणि भाईचार्याच्या वातावरणाने भारावून गेला होता.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कुरबान मेम्बर मित्र परिवार तसेच अवेश भाजा नगरसेवक मित्र परिवार यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाला धनंजय चौधरी, राजेश वानखेडे, नगरपरिषद अध्यक्ष पवन सराफ, उपाध्यक्ष चंदू कोळी, नगरसेवक अनवर खाटीक, इरफान शेख, हकीम तडवी, डॉ. दानिश शेख, युनुस अयूब, केतन किरंगे, सिद्धेश्वर वाघुळदे, राहुल गुजराती, जितेंद्र भारंबे, सागर होले, पप्पू चौधरी, महिंद्रा मडवाले, राजेश महाजन, कलिम मेम्बर तसेच सावदा येथील उपाध्यक्ष फिरोज खान आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांनी उपस्थित मान्यवर व रसिकांचे आभार मानले.

No comments