adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पुण्यातील शाईफेक प्रकरणाच्या निषेधार्थ वाशिममध्ये आंदोलन

पुण्यातील शाईफेक प्रकरणाच्या निषेधार्थ वाशिममध्ये आंदोलन  वाशिम प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) वाशिम : पुणे जिल्ह्यात सुप्रसिद्ध विच...

पुण्यातील शाईफेक प्रकरणाच्या निषेधार्थ वाशिममध्ये आंदोलन 


वाशिम प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

वाशिम : पुणे जिल्ह्यात सुप्रसिद्ध विचारवंत व व्याख्याते विकास लवांडे यांच्यावर संग्राम भंडारे यांच्याकडून करण्यात आलेल्या शाईफेक प्रकरणाच्या निषेधार्थ वाशिम जिल्ह्यात जाहीर निषेध कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वाशिम जिल्ह्यातील विविध पुरोगामी संघटना, सामाजिक कार्यकर्ते व संविधानप्रेमी नागरिकांच्या वतीने हा निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी आंदोलनकर्त्यांनी “विचारांना विचारांनी उत्तर द्या”, “अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ले सहन केले जाणार नाहीत” अशा घोषणा देत संबंधित आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली. तसेच संग्राम भंडारे याला तात्काळ अटक करून या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

कार्यक्रमादरम्यान पोलीस प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात संविधानवादी व पुरोगामी विचार मांडणाऱ्या व्यक्तींवर होणारे हल्ले लोकशाहीसाठी घातक असल्याचे नमूद करण्यात आले. महाराष्ट्रात सामाजिक सलोखा व अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी शासनाने कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणीही करण्यात आली.

यावेळी अखिल भारतीय ब्लू टायगर सेनेचे संस्थापक अध्यक्ष जगदीश मानवतकर, ज्येष्ठ कवी महेंद्र ताजणे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संतोष लांडकर, शहीद पोचीराम कांबळे क्रांती फोर्सचे जिल्हाध्यक्ष सुरेश कुचेकर, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील, तरुण वकील तज्ञ ॲड. संतोष केसवानी, अखिल भारतीय ब्लू टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष रामदास कालापाड, जिल्हा उपाध्यक्ष राहुल पडघान यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments