आदिवासी एकात्मिक प्रकल्प पीएम श्री गव्हर्नमेंट इंग्लिश मिडियम आश्रम स्कूलचा दहावीचा निकाल 100 टक्के, कु.तेजस्विनी चंदु गावीत 89℅ गुणाने पास...
आदिवासी एकात्मिक प्रकल्प पीएम श्री गव्हर्नमेंट इंग्लिश मिडियम आश्रम स्कूलचा दहावीचा निकाल 100 टक्के, कु.तेजस्विनी चंदु गावीत 89℅ गुणाने पास.
नंदुरबार प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आदिवासी विकास विभाग यांच्या अखत्यारीत असलेली नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी एकात्मिक प्रकल्प पीएम श्री गव्हर्नमेंट इंग्लिश मिडियम आश्रम स्कूल नवापूर येथील दहावी परीक्षेचा नुकताच ऑनलाईन निकाल जाहीर झाला असून इंग्लिश मिडियम आश्रम विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. यंदा विद्यालयाचा एकूण निकाल 100 टक्के इतका लागला आहे. प्रथम क्रमांक कुमारी निलीमा गावीत हिला ९०.४०टक्के गुणांसह पटकावला.तर द्वितीय क्रमांक कु.तेजस्विनी चंदू गावीत आणि कु.अर्चना नाईक या दोन्ही विद्यार्थिनींनी संयुक्तरित्या 89 टक्के गुण मिळवत यश मिळविले.तसेच तृतीय क्रमांक प्रतिज्ञा कोकणी 88.20 हिला प्राप्त झाले आहे.इंगलिश मिडियम आश्रम स्कूल
शाळेची विद्यार्थीनी प्रिंकल गावीत हिला 88 टक्के मिळवत यश संपादन केले आहे. तसेच विद्यार्थ्यांमध्ये निरंजन वसावे 85.40 टक्के,नितीक गावीत 85.20 टक्के,प्रितम कोकणी 84.80 टक्के,संकेत वसावे 82.60 टक्के, हर्षल गावीत 81.6 टक्के गुण प्राप्त करून यश मिळविले आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आदिवासी एकात्मिक प्रकल्प पीएम श्री गव्हर्मेंट इंग्लिश मीडियम आश्रम स्कूल नवापूर जिल्हा नंदुरबार येथील प्राचार्य, शिक्षक, पालक,तसेच शाळेतील कर्मचारी यांनी अभिनंदन केले तसेच विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.


No comments