adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

स्वराज्य पक्षाच्या आंदोलनाचा दणका, मिश्र पिकातील ज्वारी खरेदी नोंदणीस अखेर सुरूवात

 स्वराज्य पक्षाच्या आंदोलनाचा दणका, मिश्र पिकातील ज्वारी खरेदी नोंदणीस अखेर सुरूवात अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) संग्र...

 स्वराज्य पक्षाच्या आंदोलनाचा दणका, मिश्र पिकातील ज्वारी खरेदी नोंदणीस अखेर सुरूवात



अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

संग्रामपुर - सातबारावरील मिश्र पिकातील ज्वारीची नोंद असल्याचे कारण देत खरेदी नाकारणाऱ्या प्रशासनाला स्वराज्य पक्षाने मोठा दणका दिला आहे. पक्षाच्या आक्रमक पवित्र्यामुळे आणि आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे अखेर 'नाफेड'ने नमती भूमिका घेत मिश्र पिकातील ज्वारीची खरेदी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे राज्यातील हजारो ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून हा स्वराज्य पक्षाच्या संघर्षाचा विजय मानला जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून तांत्रिक कारणांमुळे शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी केंद्रांवर स्वीकारली जात नव्हती. विशेषत, ज्या शेतकऱ्यांनी रब्बीमधे मिश्र पीक म्हणून ज्वारीची पेरणी केली होती, त्यांना नोंदणी प्रक्रियेतून बाद केले जात होते. या अन्यायाविरुद्ध स्वराज्य पक्षाचे विशाल पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारला आंदोलनाचा इशारा दिला होता.

यावेळी बोलताना विशाल पाटील म्हणाले की, "शेतकऱ्यांनी घाम गाळून पिकवलेली ज्वारी केवळ तांत्रिक कारणांमुळे नाकारणे हा त्यांच्यावर मोठा अन्याय आहे. सरकारने ज्वारीच्या शेवटच्या दाण्यापर्यंत खरेदी करावी. जर खरेदी प्रक्रियेत पुन्हा अडथळे आले किंवा शेतकऱ्यांची अडवणूक झाली, तर राज्यातील शेतकऱ्यांचा तीव्र उद्रेक होईल आणि त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल."

स्वराज्य पक्षाच्या या इशाऱ्यानंतर प्रशासकीय हालचालींना वेग आला आणि केंद्राने मिश्र पिकातील ज्वारी नोंदणीचे आदेश दिले. या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

No comments