adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अहिल्यानगर पोलिसांचा जुगार अड्ड्यांवर सर्जिकल स्ट्राईक.. एकाच वेळी 'या '४ ठिकाणी छापे..६.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त..!

 अहिल्यानगर पोलिसांचा जुगार अड्ड्यांवर सर्जिकल स्ट्राईक.. एकाच वेळी 'या '४  ठिकाणी छापे..६.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त..!  सचिन मोकळं ...

 अहिल्यानगर पोलिसांचा जुगार अड्ड्यांवर सर्जिकल स्ट्राईक.. एकाच वेळी 'या '४  ठिकाणी छापे..६.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त..! 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर:- शहरात अवैध रित्या सुरू असलेल्या जुगार आणि बिंगो अड्ड्यांवर पोलिसांनी रविवारी सायंकाळी मोठी कारवाई केली.पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार, एकाच वेळी शहरातील चार वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करून पोलिसांनी तब्बल ६ लाख ३५ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या धडक कारवाईमुळे जुगार चालकांचे धाबे दणाणले आहेत.

१० मे २०२६ रोजी सायंकाळी ६:३० च्या सुमारास पोलीस अधीक्षक,अहिल्यानगर यांनी  सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगिर (प्रभारी अधिकारी, कॅम्प पोलीस स्टेशन भिंगार) यांना शहरातील अवैध जुगार अड्ड्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.या माहितीच्या आधारे पोलिसांनी पथके तयार करून एकाच वेळी चार ठिकाणी धाडी टाकल्या.

१)गांधीनगर (बोल्हेगाव) ५,३०० रोख,आयवा कंपनीचा टीव्ही, एक्सट्रीम वायफाय,फोन-पे मशीन, बॅनर आणि मोबाईल. १,२१,२००/-

२)दूध डेअरी चौक,शेंडी बायपास (हॉटेल मातोश्री शेजारी) ९ आरोपींना अटक, ४०,६०० रोख,लॅपटॉप,टीव्ही स्क्रीन,कीबोर्ड,फोन-पे मशीन आणि मोबाईल.२,३६,६००/-

३)शेंडी बायपास (हॉटेल भाग्यश्री शेजारी) ५ आरोपींना अटक,२१,००० रोख, डेल सीपीयू, जिओ मॉनिटर, ०२ आयफोन, लॅपटॉप आणि मोबाईल. १,४९,७००/-

४) नवनागापूर (दूध डेअरी चौक) ४ आरोपींना अटक, ३,८५० रोख, ३ सीपीयू, ६ मॉनिटर, ३ प्रिंटर, ३ स्कॅनर आणि जुगाराचे साहित्य. १,२८,३५०/- रु.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या कारवाईनंतर संबंधित आरोपीं विरुद्ध एम.आय.डी.सी.आणि तोफखाना पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम १२(अ) नुसार स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री.मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक श्री. वैभव कलुबर्मे,आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्प पोलीस ठाण्याचे स.पो.नि.जगदीश मुलगिर,पो.उपनि.गजेंद्र इंगळे,पो.उपनि.योगेश पवार,ग्रेड पो.उपनि.निसार शेख,पोलीस अंमलदार रवींद्र टकले,दिपक शिंदे,नंदकुमार पठारे,प्रमोद लहारे,इस्माईल पठाण,रामनाथ डोळे,कैलास शिरसाठ आणि पोपट देव्हारे यांनी केली आहे.

No comments