खर्चाला पैसे दिले नाहीत म्हणून रिक्षाचालकावर कोयत्याने खुनी हल्ला अहिल्यानगरमधील चाँदनी चौक हादरला! सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमक...
खर्चाला पैसे दिले नाहीत म्हणून रिक्षाचालकावर कोयत्याने खुनी हल्ला अहिल्यानगरमधील चाँदनी चौक हादरला!
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर:- शहरात गुन्हेगारांचे धाडस दिवसेंदिवस वाढत चालले असून,किरकोळ कारणावरून रक्ताचे पाट वाहू लागले आहेत. शहरातील चाँदनी चौक परिसरात एका रिक्षाचालकाने खर्चासाठी पैसे देण्यास नकार दिला,या रागातून एका माथेफिरूने त्याच्यावर लोखंडी कोयत्याने भीषण हल्ला केला. या घटनेत रिक्षाचालक गंभीर जखमी झाला असून परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अकबरअली कामरअली इराणी हे पहाटेच्या सुमारास चाँदनी चौक परिसरात थांबलेले असताना,आरोपी जाहीद याने त्यांना अडवून पैशांची मागणी केली.इराणी यांनी "माझ्याकडे पैसे नाहीत,"असे सांगताच जाहीदचा पारा चढला.त्याने सुरुवातीला अश्लील शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.वाद विकोपाला गेल्यावर आरोपीने आपल्याजवळील धारदार लोखंडी कोयता काढून इराणी यांच्यावर वार केला. हा वार वाचवण्याच्या प्रयत्नात इराणी यांच्या डाव्या हाताच्या बोटाला गंभीर इजा झाली आणि ते रक्तबंबाळ झाले. हल्ल्यानंतरही आरोपीची मुजोरी थांबली नाही; त्याने फिर्यादीला "तुला वस्तऱ्याने कापून टाकीन," अशी उघड धमकी दिली. या झटापटीत फिर्यादीच्या खिशातील ७५० रुपयेही गहाळ झाले आहेत.जखमी अकबरअली इराणी यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सहाय्यक फौजदार रेवणनाथ दहिफळे यांनी गुन्हा तात्काळ दाखल केला असून सदरील गुन्ह्याचा कपास तपास पोलीस अंमलदार अहमद इनामदार करत आहे. भरवस्तीत आणि पहाटेच्या वेळी अशा प्रकारे सशस्त्र हल्ले होत असल्याने अहिल्यानगरमधील नागरिक आणि विशेषतः रिक्षाचालक वर्गात घबराट निर्माण झाली आहे. पोलीस आता फरार आरोपी जाहीदचा शोध घेत आहेत.

No comments