जनगणनेत ‘तेली’ अशीच जात नोंदवा; ओबीसी जनगणनेची जोरदार मागणी जबलपूर येथे राष्ट्रीय कार्यकारी सभेत राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्तजी क्षीरसागर यांचे...
जनगणनेत ‘तेली’ अशीच जात नोंदवा; ओबीसी जनगणनेची जोरदार मागणी
जबलपूर येथे राष्ट्रीय कार्यकारी सभेत राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्तजी क्षीरसागर यांचे आवाहन
जबलपूर प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जबलपूर : अखिल भारतीय तैलिक साहू महासभेच्या राष्ट्रीय कार्यकारी मंडळाची सभा दि. २४ मे २०२६ रोजी जबलपूर येथील कचणार रिसॉर्ट येथे मोठ्या उत्साहात पार पडली. सभेचे अध्यक्षस्थान महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री अण्णासाहेब जयदत्तजी क्षीरसागर यांनी भूषविले.
या बैठकीस राष्ट्रीय महासचिव रामालालजी गुप्ता, राष्ट्रीय अपर सचिव डॉ. अरुणजी भस्मे, राष्ट्रीय कोषाध्यक्ष अमरंदजी साहू (दिल्ली), राष्ट्रीय महिला अध्यक्षा सौ. आभा साहू, राष्ट्रीय युवा अध्यक्ष आमदार संदीपजी साहू, राष्ट्रीय कार्यवाहक अध्यक्ष ताराचंदजी साहू, राष्ट्रीय महिला सचिव व माजी महापौर सौ. जयश्रीताई अहिरराव यांच्यासह विविध राज्यांतील प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमास केंद्रीय मंत्री तोखनलाल साहू, आमदार सियाराम साहू आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली.
यावेळी बोलताना राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्तजी क्षीरसागर यांनी ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना होणे आवश्यक असल्याचे ठामपणे सांगितले. तसेच आगामी जनगणनेत पोटजातींचा उल्लेख न करता सर्व समाजबांधवांनी आपल्या जातीची नोंद “तेली” अशीच करावी, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमात केंद्रीय मंत्री तोखनलाल साहू यांच्या हस्ते समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्रातील चोपडा येथील श्री देवकांत दादा के. चौधरी यांचा देखील राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब जयदत्तजी क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्री तोखनलाल साहू यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
सभेस महाराष्ट्रातून डॉ. अरुणजी भस्मे, रवींद्र येनूरकर, ॲड. राजीव माहुरे, के. डी. चौधरी सर, सौ. जयश्रीताई अहिरराव, ॲड. धनराज खोब्रागडे, छाया जीवणे आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments