फैजपूर इस्लामपुरा झोपडपट्टीतील रहिवाशांना हक्काची घरे द्या; पालिका प्रशासनाकडे निवेदन इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैज...
फैजपूर इस्लामपुरा झोपडपट्टीतील रहिवाशांना हक्काची घरे द्या; पालिका प्रशासनाकडे निवेदन
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर येथील इस्लामपुरा झोपडपट्टी भागातील रहिवाशांना त्यांच्या जागेवर मालकी हक्काची घरे शासनाने उपलब्ध करून द्यावीत, या मागणीसाठी अलखीजर वेल्फेअर मल्टीपर्पज सोसायटीचे अध्यक्ष डॉ. दानिश शे. निसार तसेच नगरसेवक युनूस शे. अय्युब (गबलू मेंबर) यांनी नगरपरिषद प्रशासनाकडे निवेदन सादर केले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, प्रभाग क्रमांक २ मधील गट क्रमांक ३७/३१ व ३७/३३ या इस्लामपुरा झोपडपट्टी भागात पाणीपुरवठा, सांडपाणी गटारी, सिमेंट रस्ते आणि पथदिवे अशा सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. या भागात काही नागरिक कच्च्या घरांमध्ये तर काही पक्क्या घरांमध्ये अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहेत.
रहिवाशांनी आपल्या गरजेनुसार पुनर्वसन करून संबंधित जागेवर ताबा मिळवलेला असून, त्यांना त्या जागेवर अधिकृत मालकी हक्क (सदन पट्टा) मिळणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने येणाऱ्या सर्वसाधारण सभेत (जनरल मीटिंग) याबाबत ठराव मंजूर करून तो जिल्हाधिकारी, जळगाव यांच्याकडे सादर करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या मागणीमुळे इस्लामपुरा झोपडपट्टीतील रहिवाशांना हक्काचे घर मिळून त्यांच्या राहणीमानात स्थैर्य येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

No comments