adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मलकापूर महावितरण कार्यालयावर शेतकऱ्यांची धडक; वीज समस्यांवर तातडीच्या उपाययोजनांचे आश्वासन

 मलकापूर महावितरण कार्यालयावर शेतकऱ्यांची धडक; वीज समस्यांवर तातडीच्या उपाययोजनांचे आश्वासन   अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायक...

 मलकापूर महावितरण कार्यालयावर शेतकऱ्यांची धडक; वीज समस्यांवर तातडीच्या उपाययोजनांचे आश्वासन  


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मलकापूर:- तालुक्यातील शेतकरी व नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध वीजविषयक समस्यांबाबत मंगळवारी (दि. ५ नोव्हेंबर २०२६) महावितरण (MSEB) कार्यालयावर शिवसेनेच्या माध्यमातून जोरदार धडक देण्यात आली. शिवसेना तालुकाप्रमुख दिपक चांभारे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकरी व नागरिक बिर्ला रोडवरील महावितरण कार्यालयात दाखल झाले.

यावेळी कार्यकारी अभियंता तायडे साहेब हे साईट व्हिजिटवर असल्याने उपविभागीय अभियंता खान साहेब यांनी उपस्थित नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. त्यांनी सर्व समस्या तातडीने सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले.

शेतकरी व नागरिकांनी दिलेल्या निवेदनात अनेक गंभीर प्रश्न मांडण्यात आले. तालुक्यात विविध ठिकाणी वीजतार चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असून, जांभुळधाबा, बेलाड (खापरखेड), वाघूळ, भाडगणी आणि म्हैसवाडी परिसरात अनेक पोलवरील तारा चोरीला गेल्या आहेत. या तारा तात्काळ बसवण्याची मागणी करण्यात आली.

वाघोळा येथे लोंबकळत्या तारांमुळे शॉर्ट-सर्किट होऊन लागलेल्या आगीत सुमारे १५५ आर मका जळून खाक झाला होता. संबंधित शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई देऊन धोकादायक तारा व्यवस्थित करण्याची मागणी करण्यात आली.

तसेच, काही ठिकाणी शेताच्या मध्यभागी असलेल्या डीपी व पोलमुळे शेतीचे नुकसान होत असल्याने ते कडेला स्थलांतरित करावेत, अशी मागणी करण्यात आली. वाकोडी (सदगुरू नगर) व गणेश नगर परिसरात रस्त्यामध्ये असलेले धोकादायक पोल हटवण्याचीही मागणी नागरिकांनी केली.

लोणवडी येथे वाढलेल्या वीजभारामुळे नवीन डीपी बसवण्याचा प्रस्ताव मंजूर करावा, तसेच पिंपळखुटा महादेव येथे थ्री-फेजऐवजी सिंगल-फेज कनेक्शन देण्याची मागणी करण्यात आली. भाडगणी परिसरात वाऱ्यामुळे लोंबकळणाऱ्या तारा तातडीने दुरुस्त करण्याची मागणीही करण्यात आली.

यावेळी गजानन वराडे, सुदेश राणे, भिका वाढे, रामभाऊ खाचणे, निलेश टप, विनोद ठोंबरे, भीमराव चव्हाण, शंकर वाघोदे, विजय फिरके, विकास फिरके, भगवान खुपसे, राजेंद्र जवरे आदींसह अनेक शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महावितरणकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने शेतकऱ्यांनी लवकरात लवकर प्रत्यक्ष कामे सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

No comments