adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

तिमिश बेंडाळे यांना अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठातून एम.एस. पदवी प्रदान

 तिमिश बेंडाळे यांना अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठातून एम.एस. पदवी प्रदान  इदू पिंजारी | फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) न्हावी येथील मूळ ...

 तिमिश बेंडाळे यांना अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठातून एम.एस. पदवी प्रदान 


इदू पिंजारी | फैजपूर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

न्हावी येथील मूळ रहिवासी तथा सध्या मुंबईतील मुलुंड येथे वास्तव्यास असलेले रवींद्र निळकंठ बेंडाळे यांचे सुपुत्र तिमिश रवींद्र बेंडाळे यांनी अमेरिकेतील प्रसिद्ध Boston University मधून एम.एस. इन डाटा सायन्स ही पदवी यशस्वीरित्या संपादन केली आहे. नुकतीच त्यांना ही पदवी प्रदान करण्यात आली.

तिमिश बेंडाळे यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक यशामुळे न्हावी परिसरासह कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या या यशाबद्दल दिलीप बेंडाळे, यशवंत बेंडाळे, शरद चोपडे यांच्यासह विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे. परदेशातील नामांकित विद्यापीठातून उच्च शिक्षण पूर्ण करून तिमिश यांनी परिसरातील युवकांसमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.

No comments