वाघोदा बुद्रुक येथील मागासवर्गीय दलित वस्तीच्या कामांची चौकशीची मागणी गटविकास अधिकाऱ्यांना दिले निवेदन, गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रारींचा ढ...
वाघोदा बुद्रुक येथील मागासवर्गीय दलित वस्तीच्या कामांची चौकशीची मागणी
गटविकास अधिकाऱ्यांना दिले निवेदन, गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रारींचा ढिगारा? नागरिकांत रोष
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा बुद्रुक येथील मागासवर्गीय / दलित वस्ती अंतर्गत झालेल्या विकास कामांची चौकशीसाठी गटविकास अधिकारी रावेर यांना सामाजिक कार्यकर्ते करन तायडे यांनी दिलेल्या निवेदन नमूद केले आहे की मोठा वाघोदा बुद्रुक ता. रावेर येथील मागासवर्गीय / दलित वस्ती अंतर्गत झालेल्या विकास कामांची चौकशी करण्यात यावी तसेच संबंधितांना झालेल्या कामांची माहिती अवगत व उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे
सविस्तर असे की मोठा वाघोदा, ता. रावेर, जि. जळगाव येथे मागासवर्गीय / दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत विविध विकास कामे करण्यात आलेली आहेत. सदर कामांबाबत ग्रामस्थांमध्ये अनेक शंका कुशंका व तक्रारी निर्माण झालेल्या असून, कामांची गुणवत्ता, मंजूर निधी, प्रत्यक्ष खर्च, आणि ग्रामपंचायत ने केलेल्या कामांत तफावत असल्याची शंका उपस्थित केली जाते आहे तसेच झालेल्या रस्ते कामांमध्ये मापात पाप करुन झोल केल्याचा उल्लेख तक्रारीत केला आहे यासोबतच वाघोदा बुद्रुक ग्रामपंचायत ने कामांची अंमलबजावणी सन २०२४/२०२५/२०२६ या वर्षातील दलित वस्तीतील कामांची चौकशी होणे बाबतीत दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे तरी वरील बाबींची निष्पक्ष चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी व मला माहिती उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करन समाधान तायडे यांच्या गटविकास अधिकारी रावेर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे
प्रतिक्रिया
करन समाधान तायडे
- सदर तक्रारीच्या अनुषंगाने खालील बाबींची सखोल चौकशी करण्यात यावी व संबंधितांना माहिती उपलब्ध करून द्यावी. दलित वस्तीचा निधी आरक्षित निधीः हा निधी फक्त दलित वस्त्यांमधील पायाभूत सुविधांसाठीच खर्च करणे कायदेशीर बंधनकारक आहे परंतु मोठा वाघोदा येथे ग्रामपंचायतने निधी वळवण्याच काम केला आहे बौद्ध समाजाचे ग्रामपंचायत सदस्य असून सुद्धा दलित वस्तीचा निधी कसा वळवण्यात आला? कोणाला विचारून निधी वळवला? असा प्रश्न आम्हाला पडला आहे ग्रामपंचायत वाघोदा अत्यंत भोंगळ पद्धतीचा कारभार करत आहे जिकडे दलित नाही तिकडे निधी वापरला कसा आहे. कुठे कोणते काम व किती निधीची कामे झाली आहे त्याबाबत सविस्तर माहिती मिळावी.

No comments