adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

ज्वारी खरेदीत तांत्रिक खोडा; संग्रामपूरचे शेतकरी आक्रमक, 'स्वराज्य पक्षा'चा आंदोलनाचा इशारा!

 ज्वारी खरेदीत तांत्रिक खोडा; संग्रामपूरचे शेतकरी आक्रमक, 'स्वराज्य पक्षा'चा आंदोलनाचा इशारा!  अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेम...

 ज्वारी खरेदीत तांत्रिक खोडा; संग्रामपूरचे शेतकरी आक्रमक, 'स्वराज्य पक्षा'चा आंदोलनाचा इशारा! 


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

​संग्रामपूर - तालुक्यातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात मुख्य पिकासोबत 'मिश्र पीक' म्हणून ज्वारीची लागवड केली आहे. मात्र, ७/१२ उताऱ्यावर मिश्र पीक म्हणून नोंद असलेल्या ज्वारीची नाफेड (NAFED) पोर्टलवर नोंदणी होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. प्रशासनाच्या या तांत्रिक घोळामुळे संताप व्यक्त होत असून, स्वराज्य पक्षाने थेट तहसीलदारांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे. शासनाच्या नियमानुसार अनेक शेतकऱ्यांनी 'ई-पीक' पाहणी केली आहे. मात्र, नाफेड केंद्रावर नोंदणी करताना पोर्टलवर तांत्रिक अडचणी येत आहेत. यामुळे हक्काचा शेतीमाल शासकीय आधारभूत किमतीने विकण्यापासून शेतकरी वंचित राहत आहेत. परिणामी, शेतकऱ्यांना आपली ज्वारी व्यापाऱ्यांना कवडीमोल दराने विकावी लागत असून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

विशाल चोपडे यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्य पक्षाने प्रशासनाला धारेवर धरले आहे. "जर तात्काळ पोर्टलवरील तांत्रिक अडचण दूर करून मिश्र पिकातील ज्वारीची नोंदणी सुरू झाली नाही, तर सर्व पीडित शेतकऱ्यांना सोबत घेऊन तहसील कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल," असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी स्वराज्य पक्षाचे विशाल राजुकमार चोपडे, गौरव जळमकार, ओम बाहाकार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आता प्रशासन यावर काय पाऊल उचलते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

No comments