अकोटमध्ये ‘स्वराज्य’ची गर्जना, अरुण अंबळकार यांच्या खांद्यावर शहराध्यक्षपदाची धुरा अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अको...
अकोटमध्ये ‘स्वराज्य’ची गर्जना, अरुण अंबळकार यांच्या खांद्यावर शहराध्यक्षपदाची धुरा
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अकोट - विदर्भाच्या राजकारणात सध्या 'स्वराज्य' पक्षाने आपली पकड मजबूत करण्यास सुरुवात केली असून, अकोट शहरात पक्षाला मोठे यश मिळाले आहे. शहरातील ख्यातनाम व्यक्तिमत्व अरुण अंबळकार यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत 'स्वराज्य' पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. त्यांच्या या प्रवेशामुळे अकोटमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पक्षप्रमुख छत्रपती संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी अंबळकार यांची अकोट शहराध्यक्षपदी नियुक्ती केली. एका विशेष सोहळ्यात त्यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. डिक्कर यावेळी म्हणाले की, "अंबळकार यांच्यासारख्या अनुभवी नेतृत्वामुळे अकोटमधील सर्वसामान्यांच्या प्रश्नांना आता हक्काची व्यासपीठ मिळेल. अंबळकार हे सक्रिय व्यक्तीमत्व असल्याने शहरातील प्रलंबित नागरी समस्या सोडवण्यासाठी आणि स्वराज्य पक्षाची विचारधारा आणि शिवरायांचे विचार घराघरांत पोहोचवणे. तसेचयुवकांना संघटित करून अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी सक्रिय झाले आहेत, अंबळकार यांचा दांडगा जनसंपर्क पक्षासाठी मोठी जमेची बाजू ठरणार आहे. त्यांच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष करत या निर्णयाचे स्वागत केले. प्रस्थापित पक्षांच्या बालेकिल्ल्यात आता 'स्वराज्य' पक्षाचे हे नवे आव्हान आगामी काळात काय वळण घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments