adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

एसटीच्या ‘एनसीएमसी’ स्मार्ट कार्ड योजनेला वेग; ‘इबीक्स’ व ‘एचजेआर’ने दूर केल्या तांत्रिक अडचणी ग्रामीण भागात विशेष एजंट नियुक्त; नागरिक, केंद्रचालक आणि ग्राहकांकडून समाधान व्यक्त

 एसटीच्या ‘एनसीएमसी’ स्मार्ट कार्ड योजनेला वेग; ‘इबीक्स’ व ‘एचजेआर’ने दूर केल्या तांत्रिक अडचणी ग्रामीण भागात विशेष एजंट नियुक्त; नागरिक, के...

 एसटीच्या ‘एनसीएमसी’ स्मार्ट कार्ड योजनेला वेग; ‘इबीक्स’ व ‘एचजेआर’ने दूर केल्या तांत्रिक अडचणी

ग्रामीण भागात विशेष एजंट नियुक्त; नागरिक, केंद्रचालक आणि ग्राहकांकडून समाधान व्यक्त


जळगाव प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

जळगाव: महाराष्ट्र शासनाच्या एसटी महामंडळाच्या प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘एनसीएमसी’ (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) स्मार्ट कार्ड योजनेतील तांत्रिक अडचणी अखेर दूर करण्यात आल्या आहेत. कार्डनिर्मितीचे कंत्राटदार ‘इबीक्स’ (EBIX) आणि वितरक ‘एचजेआर’ (HJR) या कंपन्यांनी परस्पर समन्वय साधत कामकाजाला गती दिली असून, ग्रामीण भागात विशेष एजंट नियुक्त करून सेवा अधिक प्रभावीपणे सुरू केली आहे. त्यामुळे नागरिकांसह केंद्रचालकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून अनेक केंद्रांवर लॉगिन आयडी व पासवर्ड उपलब्ध नसल्याने मशिन्स बंद अवस्थेत पडून होत्या. परिणामी स्मार्ट कार्ड प्रक्रियेत अडथळे निर्माण होत होते. मात्र, दोन्ही कंपन्यांनी युद्धपातळीवर काम करत आवश्यक तांत्रिक अडचणी दूर केल्या असून, जळगाव जिल्ह्यासह राज्यातील विविध केंद्रांवर मशिन्स आता सुरळीतपणे कार्यरत झाल्या आहेत. आवश्यक लॉगिन आयडी आणि पासवर्ड तातडीने उपलब्ध करून दिल्याने केंद्रचालकांनी समाधान व्यक्त करत कंपन्यांचे आभार मानले आहेत.

यापूर्वी स्मार्ट कार्ड मिळवण्यासाठी महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सवलतधारक प्रवाशांना एसटी आगारांमध्ये वारंवार चकरा माराव्या लागत होत्या. मात्र आता ग्रामीण भागातील स्थानिक केंद्रांवर एजंटच्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध झाल्याने नागरिकांची वणवण थांबली आहे. स्थानिक पातळीवर सुविधा उपलब्ध झाल्याने आर्थिक खर्चासह मानसिक त्रासही कमी झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

दरम्यान, कार्ड अॅक्टिवेशनची प्रक्रिया अधिक जलद व्हावी आणि नागरिकांची गैरसोय टळावी यासाठी संबंधित कंपनीकडून महाराष्ट्रातील सुमारे २५० आगारांमध्ये प्रत्येकी दोन अतिरिक्त कंडक्टर मशिन्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

परिवहन विभाग, ‘इबीक्स’ आणि ‘एचजेआर’ कंपन्यांच्या तत्परतेमुळे ‘एनसीएमसी’ स्मार्ट कार्ड योजना आता अधिक प्रभावीपणे राबवली जात असून, सर्वसामान्य प्रवाशांना त्याचा मोठा फायदा होताना दिसत आहे.

No comments