adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

एस्प्लनेड कनिष्ठ महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी संघ स्थापना सोहळा उत्साहात संपन्न

 एस्प्लनेड कनिष्ठ महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी संघ स्थापना सोहळा उत्साहात संपन्न   भरत कोळी, यावल ता. प्रतिनिधी (संपादक - हेमकांत गायकवाड)...

 एस्प्लनेड कनिष्ठ महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी संघ स्थापना सोहळा उत्साहात संपन्न 


 भरत कोळी, यावल ता. प्रतिनिधी

(संपादक - हेमकांत गायकवाड)

कांदिवली येथील एस्प्लनेड कनिष्ठ वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी संघ स्थापना सोहळा नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. माजी विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम आठवणींना उजाळा देणारा आणि भावनिक क्षणांनी भरलेला ठरला.

महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक लेझीम नृत्याने झाली. त्यानंतर माजी विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या वर्गखोल्या, मित्रमंडळी आणि शिक्षकांच्या सहवासातील आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमस्थळी माजी विद्यार्थी गणेश सोलंकी यांनी आकर्षक रांगोळी साकारली होती, तर समीर बुट्टा यांनी आपल्या कारखान्यात तयार केलेले पेन माजी विद्यार्थी संघाच्या नावाने उपस्थितांना भेट दिले.

दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक माननीय जयेशभाई मजीठिया यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सरस्वती वंदनेने वातावरण भारावून गेले. स्वागतगीत, मान्यवरांचा सत्कार आणि माजी विद्यार्थ्यांच्या मनोगतांनी कार्यक्रम अधिक रंगतदार झाला. 


यावेळी निरंजना मजेठीया कॉलेजच्या प्राचार्या डॉ. रेश्मा वाजा, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीपक वाणी तसेच विज्ञान शाखेच्या प्रमुख सौ. शांती कन्नन यांनी आपले मनोगत व्यक्त करत माजी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमात “एस्प्लनेड ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स २०२६” या माजी विद्यार्थी संघाच्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. अध्यक्षपदी २००१ बॅचचे माजी विद्यार्थी अमित केणी यांची नियुक्ती करण्यात आली.

माजी विद्यार्थ्यांनी नृत्य, कला सादरीकरण, हास्यखेळ आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांतून जुन्या आठवणींना उजाळा दिला. शिक्षकांनीही नृत्य व एकपात्री अभिनय सादर करून उपस्थितांची मने जिंकली. शिक्षक, प्राचार्य आणि माजी विद्यार्थ्यांनी एकत्र काढलेल्या छायाचित्रांनी कार्यक्रमातील स्नेहबंध अधिक दृढ झाले.

आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. त्यानंतर आयोजित भोजनाचा उपस्थितांनी आस्वाद घेतला. हा स्नेहमेळावा संपला असला तरी या आठवणी आणि जपलेली नाती कायम सर्वांच्या मनात ताजीतवानी राहतील, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

No comments