इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल ९९.२० टक्के; विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश धरणगाव प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) धरणग...
इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल ९९.२० टक्के; विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश
धरणगाव प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
धरणगाव येथील इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथील दहावी परीक्षेचा नुकताच ऑनलाईन निकाल जाहीर झाला असून विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. यंदा विद्यालयाचा एकूण निकाल ९९.२० टक्के इतका लागला आहे.
सेमी माध्यमातून प्रथम क्रमांक मिलिंद निवृत्ती कोल्हे यांनी ४७३ गुण मिळवत ९४.६० टक्के गुणांसह पटकावला. द्वितीय क्रमांक भाग्यश्री मुरलीधर पाटील हिने ४७२ गुण मिळवत ९४.४० टक्के गुण प्राप्त केले. तर तृतीय क्रमांक तृप्ती ज्ञानेश्वर पाटील आणि आम्रपाली सतीश महाजन या दोन्ही विद्यार्थिनींनी संयुक्तरित्या ४७० गुण व ९४ टक्के गुण मिळवत यश मिळविले.
मराठी माध्यमातून प्रथम क्रमांक माही विश्वनाथ वाघरे हिने ४५८ गुण मिळवत ९१.६० टक्के गुण प्राप्त केले. द्वितीय क्रमांक यज्ञा वसंत वाघरे हिने ४५३ गुणांसह ९०.६० टक्के गुण मिळविले. तर तृतीय क्रमांक जयश्री भरत भोई हिने ४४८ गुण मिळवत ८९.६० टक्के गुणांसह यश संपादन केले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे अध्यक्ष डी. जी. पाटील, संस्थेचे सचिव सी. के. पाटील, मुख्याध्यापिका एस. एस. पाटील, पर्यवेक्षक ए. एस. पाटील, संचालक भरत पाटील, मच्छिंद्र पाटील तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


No comments