adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

उज्ज्वल यशाची परंपरा कायम : आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा एस.एस.सी. निकाल ९६.२० टक्के

 उज्ज्वल यशाची परंपरा कायम : आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा एस.एस.सी. निकाल ९६.२० टक्के  धरणगाव प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गा...

 उज्ज्वल यशाची परंपरा कायम : आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा एस.एस.सी. निकाल ९६.२० टक्के 


धरणगाव प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

धरणगाव येथील आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय धरणगाव विद्यालयाने एस.एस.सी. परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत ९६.२० टक्के निकालाची दमदार नोंद केली आहे. विद्यालयाच्या या उज्ज्वल यशामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यावर्षी विद्यालयातून एस.एस.सी. परीक्षेसाठी एकूण ७९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ७६ विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे ६० विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले असून १३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर ३ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

विद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थ्यांनीही घवघवीत यश संपादन केले आहे. परीक्षेत दिशा दीपक पाटील हिने ४६३ गुण मिळवून (९२.६०) टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. गुंजन प्रेमराज पाटील हिने ४६२ गुण व( ९२.४०) टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तसेच तृतीय क्रमांक दोन विद्यार्थिनींनी संयुक्तरीत्या ४५९ गुण व (९१.८०) टक्के गुण मिळवून संपादन केला.

विद्यालयाच्या या यशाबद्दल मुख्याध्यापक संदीपकुमार सोनवणे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे व पालकांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांच्या सहकार्यामुळे हे यश मिळविल्याचे त्यांनी सांगितले.

संस्थेचे अध्यक्ष सी. के. पाटील, सचिव सुरेखा पाटील तसेच संचालक मच्छिंद्र पाटील, अश्विनकुमार पाटील व आशिषकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकवृंदाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments