यावल व्यापाऱ्याला लूटप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) येथील एका व्यापाऱ्याला लुटी ...
यावल व्यापाऱ्याला लूटप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
येथील एका व्यापाऱ्याला लुटी प्रकरणी यावल पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्यात आला असून त्यात आसिफ बशीर तडवी राहणार बोरावल गेट आणि दोघे अनोळखी साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावल शहरातील किरकोळ छोट्या दुकानदारांना विक्री केलेल्या गोळ्या बिस्किटांचे मालाचे पैशांची वसुली करून फिर्यादी प्रमोद जगन्नाथ बुरुजवाले हे जात असताना त्याच्या खिशातील रोख रक्कम 18 हजार रुपये यांचे खिशात ठेवून फाईल बजाज शोरूम कडे उर्वरित पैशांचे वसुली करता जात असताना फिर्यादीच्या ओळखीचा असलेला आरोपी आसिफ बशीर तडवी हा त्याचे इतर दोघे अनोळखी साथीदारां सोबत फिर्यादीची मागून मोटार सायकलने येऊन त्याची कॉलर पकडून त्याचे कडे पैशांची बळजबरीने मागणी करून शिवीगाळ दमदाटी करून त्याचे पेंटचे दोन्ही खिशातील 18 हजार रुपये रोख रक्कम बळजबरीने काढून चोरून घेतले याबाबत फिर्यादी प्रमोद जगन्नाथ बुरूजवाले यांच्या तक्रारीनुसार यावल पोलीस स्टेशनला गु.र नंबर 193 /2026 भारतीय न्याय संहिता कलम 309 चार 351 (3) 3 (5 ) अन्वये तिघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास यावल पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाच पोडे हे करीत आहे.
No comments