adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अनधिकृत ‘HTBT’ कापूस बियाण्यावर धाड; ९.८० लाखांचा मुद्देमाल जप्त

 अनधिकृत ‘HTBT’ कापूस बियाण्यावर धाड; ९.८० लाखांचा मुद्देमाल जप्त  कासोदा प्रतिनिधी (शैलेश पांडे) :  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) कासोदा येथ...

 अनधिकृत ‘HTBT’ कापूस बियाण्यावर धाड; ९.८० लाखांचा मुद्देमाल जप्त 


कासोदा प्रतिनिधी (शैलेश पांडे) : 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

कासोदा येथे कृषी विभाग आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत अनधिकृत ‘HTBT’ कापूस बियाण्यांचा मोठा साठा जप्त केला. या कारवाईत सुमारे ४ लाख ८० हजार रुपये किमतीची ४०० बियाण्यांची पाकिटे तसेच वाहतुकीसाठी वापरलेली मारुती स्विफ्ट डिझायर कार असा एकूण ९ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, योगेश बळवंत पाटील हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी प्रतिबंधित ‘HTBT’ कापूस बियाण्यांची छुप्या पद्धतीने विक्री करत असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती. त्यानुसार ७ मे २०२६ रोजी कृषी विभागाने कासोदा परिसरात तपासणी केली असता संबंधित व्यक्तीकडे मोठ्या प्रमाणात अनधिकृत बियाण्यांचा साठा आढळून आला.

कारवाईदरम्यान ‘प्रीमियम रिसर्च हायब्रीड कॉटन सीड’, ‘श्री गणेशा +५जी’ आणि ‘आकाश +५जी’ या नावाने विक्रीसाठी ठेवलेली ४०० बियाण्यांची पाकिटे जप्त करण्यात आली. या बियाण्यांची किंमत अंदाजे ४.८० लाख रुपये असून वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली मारुती स्विफ्ट डिझायर कारही जप्त करण्यात आली आहे.

या प्रकरणी योगेश बळवंत पाटील (रा. सौंदाणे, जि. धुळे) आणि नितीन देवरे (रा. वाडीभोकंर, जि. धुळे) यांच्याविरुद्ध कासोदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर बियाणे कायदा १९६६, बियाणे नियम १९८८, पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६, कापूस बियाणे अधिनियम २००९ तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई जिल्हा अधिक्षक कुर्बान तडवी, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे, एरंडोल तालुका कृषी अधिकारी निखिल टोळकर, धरणगाव तालुका कृषी अधिकारी परेश बडगुजर, सहाय्यक कृषी अधिकारी सचिन पाटील तसेच कासोदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील यांच्या पथकाने केली.

No comments