adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

NEET घोटाळ्यानंतर नवा वाद : CBI कोठडीत असलेल्या शिवराज मोटेगावकरांच्या इमारतीची ग्रामपंचायतीकडेच नोंद नाही

 NEET घोटाळ्यानंतर नवा वाद : CBI कोठडीत असलेल्या शिवराज मोटेगावकरांच्या इमारतीची ग्रामपंचायतीकडेच नोंद नाही  उत्तम माने लातुर जि.प्र. (संपाद...

 NEET घोटाळ्यानंतर नवा वाद : CBI कोठडीत असलेल्या शिवराज मोटेगावकरांच्या इमारतीची ग्रामपंचायतीकडेच नोंद नाही 


उत्तम माने लातुर जि.प्र.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

लातूर:-  देशभर चर्चेत आलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणात CBI कोठडीत असलेले RCC क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांच्याभोवती आता आणखी एका नव्या वादाची भर पडली आहे. लातूर जिल्ह्यातील खोपेगाव ग्रामपंचायत हद्दीत उभारण्यात आलेल्या त्यांच्या भव्य इमारतीची ग्रामपंचायत दप्तरी कोणतीही नोंद नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून, प्रशासनात खळबळ उडाली आहे.

खोपेगाव ग्रामपंचायतीचे अधिकारी परमेश्वर शिरुरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित इमारतीची ग्रामपंचायतीकडे कोणतीही अधिकृत नोंद उपलब्ध नाही. गावाच्या हद्दीत कोट्यवधी रुपयांची टोलेजंग इमारत उभी राहत असताना तिची नोंद प्रशासनाकडे नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

सदर बांधकामासाठी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या होत्या का? मालमत्ता कर भरला गेला होता का? तसेच संबंधित बांधकाम नियमांनुसार झाले होते का? याबाबत ग्रामस्थांमध्ये तीव्र चर्चा सुरू झाली आहे. प्रशासनाला न जुमानता  हा कारभार सुरू होता का, असा सवालही नागरिक उपस्थित करत आहेत.

NEET पेपरफुटी प्रकरणामुळे आधीच चर्चेत आलेल्या मोटेगावकर यांच्या अडचणी आता आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल करणाऱ्या या संस्थाचालकाने नियमांना हरताळ फासून बेकायदेशीर साम्राज्य उभे केले का, याची चर्चा जिल्हाभर रंगली आहे.

दरम्यान, ग्रामपंचायत प्रशासनाने या प्रकरणात चौकशीचे संकेत दिले असून महसूल विभाग, बांधकाम विभाग आणि कर प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. एवढे मोठे बांधकाम सुरू असताना संबंधित यंत्रणांना त्याची माहिती नव्हती का, की सर्व काही कुणाच्या आशीर्वादाने सुरू होते, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.

गावातील नागरिकांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली असून, “पेपरफुटीपासून बेकायदा बांधकामापर्यंत सर्व प्रकरणांची सखोल चौकशी व्हावी,” अशी मागणी पुढे येत आहे. NEET घोटाळ्यानंतर आता कथित बेकायदा इमारत प्रकरणामुळे शिवराज मोटेगावकर पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.

No comments